आवळा सुपारी हा पारंपरिक भारतीय पाचक म्हणून ओळखला जाणारा पदार्थ आहे. आवळा सुपारी आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. तसेच आंबट, गोड आणि किंचित तिखट असा स्वाद असल्यामुळे खायलाही छान लागते. (Check out the traditional recipe for making fresh, juicy amla supari for better digestion)ही सुपारी पचनक्रिया सुधारतो आणि पोट हलके ठेवते.
आवळ्यात जीवनसत्त्व सी, अँटी ऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. आवळा सुपारी खाल्ल्याने पोटातील आम्ल कमी होते, अपचनाचा त्रास कमी होतो आणि भूक वाढते. तिच्या आंबट - गोड चवीमुळे तोंडात लाळ तयार होते, ज्यामुळे अन्नाचे पचन अधिक चांगले होते. आवळा सुपारी घरी तयार करणेही अगदी सोपे आहे. त्यामुळे हे उत्तम पाचक घरीच तयार करा.
कृती:१. छान ताजे आवळे घ्यायचे. आवळे स्वच्छ धुऊन घअयायचे मग एका पातेल्यात पाणी गरम करुन त्यात घालायचे आणि ५ ते ७ मिनिटे उकळवायचे. आवळे मऊ झाले की पाणी काढून टाका आणि थंड होऊ द्या.
२. आवळे छान थंड झाल्यावर आवळ्याच्या फोडी करुन घ्यायच्या. मध्यम आकाराच्या फोडी करा. त्यातील बिया काढून टाका. एका भांड्यात साखर किंवा गूळ आणि थोडे पाणी घालून एक तारी पाक तयार करायचा. पाक तयार झाला की त्यात आवळ्याच्या फोडी टाका आणि मंद आचेवर ५–७ मिनिटे शिजवा.
३. हे मिश्रण थंड झाल्यावर आवळ्याच्या फोडी चाळणीत किंवा स्वच्छ कापडावर पसरवून २–३ दिवस सुकवून घ्यायच्या. उन्हातच सुकवा, म्हणजे छान सुकतात. अगदी मस्त होतात. फोडी कोरड्या झाल्यावर त्यात काळे मीठ, सैंधव मीठ, जिरे पूड, मिरी पूड, हिंग आणि लिंबाचा रस घालून नीट मिसळा. छान ढवळून झाल्यावर परत वाळवून घ्यायचे. सुकल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
Web Summary : Amla supari, a traditional Indian digestive, boosts digestion and reduces acidity. Rich in Vitamin C and antioxidants, it aids detoxification. This easy homemade recipe uses amla, sugar/jaggery, and spices. Sun-dry the mixture after coating with spices and store in an airtight container.
Web Summary : आंवला सुपारी, एक पारंपरिक भारतीय पाचक, पाचन को बढ़ावा देता है और एसिडिटी को कम करता है। विटामिन सी और एंटीऑक्सीडेंट से भरपूर, यह डिटॉक्सिफिकेशन में मदद करता है। यह आसान घरेलू नुस्खा आंवला, चीनी/गुड़ और मसालों का उपयोग करता है। मसालों के साथ कोटिंग के बाद मिश्रण को धूप में सुखाएं और एक एयरटाइट कंटेनर में स्टोर करें।