दिवाळीसाठी फराळाचे पदार्थ तयार करण्याची लगबग एव्हाना घरोघरी सुरु झालीच असेल. फराळ म्हटलं की, सगळ्या पदार्थांमधील भाजणीची चकलीच सर्वांना अतिशय आवडते. फराळाची तयारी सुरु झाली की, घराघरांत चकलीचा सुवास दरवळायला लागतो. काटेरी, खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच (Chakli Bhajni Recipe) विरघळणारी चकली खायला अधिकच चविष्ट लागते. कुरकुरीत, सोनेरी चकली तयार करायची असेल तर भाजणीचे अचूक प्रमाण आणि ती योग्य पद्धतीने तयार करणे खूप महत्त्वाचे असते. जर भाजणीचे प्रमाण आणि साहित्य चुकले तर, तर चकली एकतर कडक होते, तळताना विरघळते किंवा मऊ पडते(How To Make Perfect Chakli Bhajani At Home).
चुकीचं प्रमाण किंवा नीट न भाजलेलं पीठ चकलीची चव आणि पोत दोन्ही बिघडवू शकतं. भाजणीची चकली परफेक्ट होण्यासाठी तांदूळ, डाळी आणि मसाल्यांचे नेमके प्रमाण किती असावे? कोणते जिन्नस कसे भाजून घ्यावेत जेणेकरून पिठाचा सुगंध आणि पोषणमूल्ये टिकून राहतील यासाठी काही खास टिप्स पाहूयात. उत्तम चकली भाजणी तयार करण्याचे पारंपरिक आणि अचूक प्रमाण आणि त्यामागील योग्य पद्धत समजून घेतली, आणि हे 'परफेक्ट' गणित एकदा जमले की, चकली कधीही बिघडणार किंवा फसणार नाहीच! चकलीची भाजणी तयार करण्याचे योग्य प्रमाण, लागणारे साहित्य आणि परफेक्ट भाजणी तयार करण्याची सोपी पद्धत, ज्यामुळे तुमची चकली होईल अगदी विकत सारखी कुरकुरीत आणि स्वादिष्ट.
साहित्य :-
१. तांदूळ - १ किलो (जाड, जुना तांदूळ)
२. चणे - २५० ग्रॅम
३. चणा डाळ - २०० ग्रॅम
४. पिवळी मूग डाळ - १०० ग्रॅम
५. पांढरी उडीद डाळ - ५० ग्रॅम
६. पोहे - ५० ग्रॅम
७. साबुदाणा - ३० ते ३५ ग्रॅम
८. धणे - २० ग्रॅम
९. जिरे - १० ग्रॅम
१०. काळीमिरी - १ टेबलस्पून
११. बडीशेप - २ टेबलस्पून
आता कमी सायीतही निघेल भरपूर साजूक तूप! चमचाभर मिसळा पांढरा पदार्थ - दाणेदार, रवाळ तूप तयार...
कृती :-
१. चकलीची भाजणी तयार करण्यासाठी सर्वातआधी जाड पृष्ठभाग असलेली किंवा बिडाची कढई घ्यावी.
२. या कढईत चकलीच्या भाजणीचे सगळे जिन्नस एका मागून एक खरपूस असे भाजून घ्यावेत.
३. चकली भाजणी तयार करण्यासाठी सगळे जिन्नस भाजून घेतल्यानंतर ते एका मोठ्या डिशमध्ये काढून घ्यावेत.
४. सगळे मिश्रण थोडे थंड झाल्यावर बारीक वाटून त्याची खमंग अशी चकली भाजणी तयार करावी.
गिरणीतून वाटून आणलेली ही चकली भाजणी व्यवस्थित एका डब्यांत स्टोअर करुन ठेवल्यास ४ ते ६ महिने चांगली व्यवस्थित टिकून रहाते.
गरमागरम पहाडी मसाला चहा! सर्दी, खोकला पचन आणि इम्युनिटीसाठी आहे वरदान - प्या 'असा' फक्कड चहा...
चकलीची भाजणी तयार करताना लक्षात ठेवा...
१. चकली भाजणी तयार करताना सर्व जिन्नस हलकेच खमंग भाजून घ्यावे. त्यांचा रंग पूर्णपणे बदलेपर्यंत जिन्नस भाजण्याची चूक करु नये.
२. भाजणीतील सर्व जिन्नस मंद आचेवर भाजून घ्यावेत.
३. भाजणी भाजण्यासाठी नेहमी जाड पृष्ठभाग किंवा बिडाच्या कढईचाच वापर करावा.
४. भाजणी तयार करताना डाळींचे प्रमाण योग्य प्रमाणांत असावे. डाळींमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन्स असल्याने चकली काहीवेळा मऊ पडते, यामुळे भाजणी तयार करताना डाळींचे प्रमाण व्यवस्थित मोजून - मापून घ्यावे.
५. भाजणी गिरणीत बारीक वाटण्यासाठी देताना, गहू, ज्वारी, बाजरी यावर वाटू नये यामुळे भाजणीची चव बिघडते.