Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > चैत्र गौर: हळदी कुंकवासाठी कैरीच्या डाळीची चटपटीत रेसिपी, चव अशी की सगळ्याजणी पुन्हा- पुन्हा खातील..

चैत्र गौर: हळदी कुंकवासाठी कैरीच्या डाळीची चटपटीत रेसिपी, चव अशी की सगळ्याजणी पुन्हा- पुन्हा खातील..

Chaitra Gaur Special Kairichi Dal Recipe: चैत्र गौरीचं हळदी कुंकू असेल तर त्यासाठी पुढे सांगितलेल्या पद्धतीने कैरीची डाळ किंवा आंबेडाळ करून पाहा. सगळ्यांना खूप आवडेल...(how to make kairichi dal?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2026 13:21 IST2026-04-02T13:20:57+5:302026-04-02T13:21:41+5:30

Chaitra Gaur Special Kairichi Dal Recipe: चैत्र गौरीचं हळदी कुंकू असेल तर त्यासाठी पुढे सांगितलेल्या पद्धतीने कैरीची डाळ किंवा आंबेडाळ करून पाहा. सगळ्यांना खूप आवडेल...(how to make kairichi dal?)

chaitra gaur special kairichi dal recipe, how to make kairichi dal, ambe dal recipe for chaitra gaur  | चैत्र गौर: हळदी कुंकवासाठी कैरीच्या डाळीची चटपटीत रेसिपी, चव अशी की सगळ्याजणी पुन्हा- पुन्हा खातील..

चैत्र गौर: हळदी कुंकवासाठी कैरीच्या डाळीची चटपटीत रेसिपी, चव अशी की सगळ्याजणी पुन्हा- पुन्हा खातील..

गुढीपाडवा झाला की त्यानंतर येणाऱ्या तृतीयेला महाराष्ट्रात घरोघरी चैत्रगौर बसते. एका महिन्यासाठी ही गौर घरात विराजमान असते आणि त्यानंतर अक्षय्य तृतीयेला ती उठते. या मधल्या एक महिन्यात मग महिला आनंदाने चैत्रगौरीचं हळदी- कुंकू ठेवतात. आता चैत्रगौरीचं हळदीकुंकू असलं की काही खास पदार्थ यादिवशी हमखास केले जातातच.. त्यापैकी एक म्हणजे कैरी घालून केलेली हरबऱ्याची वाटली डाळ आणि दुसरा पदार्थ म्हणजे कैरीचं पन्हं (Chaitra Gaur Special Kairichi Dal Recipe). आता यापैकी कैरीची डाळ किंवा आंबेडाळ कशी करायची ते पाहुया..(how to make kairichi dal?)

 

चैत्रगौर हळदीकुंकू कार्यक्रमासाठी कैरीची डाळ कशी करायची?

साहित्य

१ वाटी चणा डाळ, 

६ ते ७ हिरव्या मिरच्या आणि १ मध्यम आकाराची कैरी, 

भुमी पेडणेकर सांगतेय वेटलॉस सिक्रेट, म्हणते चित्रपटांसाठी वजन वाढवणं- कमी करणं आता पुरे, कारण...

फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग आणि कडिपत्ता

१ टीस्पून बारीक किसलेलं आलं आणि १ टेबलस्पून लिंबाचा रस

बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ

कृती

 

कैरीची वाटली डाळ करण्यासाठी सगळ्यात आधी हरबरा डाळ किंवा चणा डाळ २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर ती ८ ते १० तास भिजवून ठेवा. 

यानंतर भिजलेली चणाडाळ मिक्सरमधून थोडी जाडीभरडी वाटून घ्या. डाळ अगदी बारीक करू नये. कारण जाडसर डाळच छान लागते. यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा.

हिमोग्लाेबिन कमी असल्याने मुलं नेहमीच आजारी पडतात - अशक्त असतात? ५ टिप्स- लोह वाढेल भराभर

तेल घालून फोडणी करून घ्या. नंतर वाटलेली हरबरा डाळा आणि किसलेली कैरी कढईत घालून वाफ येऊ द्या. चवीनुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी थोडा लिंबाचा रस घाला. पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवून वाफ घेतली की त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. मस्त चटपटीत कैरीची डाळ तयार. 

 

Web Title : चैत्र गौर स्पेशल: हल्दी कुमकुम के लिए खट्टे कच्चे आम की दाल की रेसिपी

Web Summary : चैत्र गौर के हल्दी कुमकुम समारोह के लिए स्वादिष्ट कच्चे आम की दाल बनाएं। यह खट्टा व्यंजन, भिगोए और दरदरे पिसे हुए चने, कच्चे आम और मसालों के तड़के से बना है, जरूर आज़माएं। धनिया और नींबू के रस से गार्निश करें।

Web Title : Chaitra Gaur Special: Tangy Raw Mango Dal Recipe for Haldi Kumkum

Web Summary : Make delicious raw mango dal for Chaitra Gaur's Haldi Kumkum ceremony. This tangy dish, made with soaked and coarsely ground chickpeas, raw mango, and a tempering of spices, is a must-try. Garnish with coriander and lemon juice for the perfect taste.