Join us

फ्लॉवरची करा परतून भाजी - खमंग, मसालेदार फ्लॉवर एकदा खा, पुन्हा करालच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2025 15:19 IST

cauliflower fry recipe - delicious, spicy cauliflower sabzi, eat it once, you'll make it again : फ्लॉवरची अशी मसालेदार भाजी एकदा कराच.

फ्लॉवरची भाजी घरोघरी केली जीते. चवीला फ्लॉवरची चव सगळ्यांना आवडतेच असे नाही. मात्र एकदा फ्लॉवरची अशी चमचमीत भाजी नक्की करुन पाहा.(cauliflower fry recipe - delicious, spicy cauliflower sabzi, eat it once, you'll make it again) करायला अगदी सोपी आहे, तसेच झटपट होते. मसालेदार भाजी खायची इच्छा असेल, तर ही रेसिपी नक्की करा. 

साहित्य फ्लॉवर, बटाटा, गाजर, कांदा, टोमॅटो, मटार, लसूण, आलं, हिरवी मिरची, गरम मसाला, कांदा-लसूण मसाला, मीठ, लाल तिखट, गोडा मसाला, तेल, मोहरी, जिरे 

कृती१. फ्लॉवर स्वच्छ धुवायचा. त्याचे तुकडे करायचे. मध्यम आकाराचे करायचे. अगदी चुरा करु नका. लहान तुकडे ठेवा. गाजर सोलायचे. गाजराचेही लहान तुकडे करायचे. तसेच कांदा सोलायचा आणि छान बारीक चिरायचा. मटार सोला मस्त ताजे दाणे काढून ठेवा. टोमॅटोही चिरुन घ्यायचा. बटाट्याचे मध्यम आकाराचे काप करायचे. 

२. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घ्यायची. एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. त्यावर फ्लॉवरचे तुकडे परतायचे. जरा छान परतून झाल्यावर काढून घ्यायचे. मग थोड्या तेलावर बटाटा परतून घ्यायचा. त्यात गाजरही घाला आणि गारज छान परतून घ्या. बटाटा आणि गाजरही काढून घ्या. 

३. पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. त्यात चमचाभर मोहरी घाला आणि तडतडू द्या. नंतर थोडे जिरे घाला. जिरे फुलल्यावर त्यात ठेचलेली लसूण आणि हिरवी मिरची घाला. मस्त परतून घ्या. मग कांदा परतायचा. कांदा गुलाबीसर परतल्यावर त्यात मटारचे दाणे घाला आणि शिजू द्या. चमचाभर पाणी घाला. वाफ काढून घ्या. दाणे आरामात शिजतात. मग त्यात चमचाभर गोडा मसाला, तेवढाच कांदा-लसूण मसाला घाला. तसेच आवडी नुसार लाल तिखट घाला. चवी पुरते मीठ घाला आणि परतून घ्या. मसाला छान परतल्यावर त्यात गाजर, बटाटा, फ्लॉवर आणि टोमॅटो घाला. झाकण ठेऊ नका. थोडे तेल घाला आणि भाजी खमंग परतून घ्या. 

४. त्यातील पाणी आटेल आणि भाजी सुकी होईल. मग गॅस बंद करा. फ्लॉवर छान खमंग परतला जाईल याची काळजी घ्यायची. बटाटाही छान परता. चपाती, भाकरीसोबत ही भाजी मस्त लागते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cauliflower Fry Recipe: Delicious, Spicy Sabzi You'll Make Again!

Web Summary : Make delicious, spicy cauliflower sabzi quickly. Fry cauliflower, potatoes, and carrots. Add mustard seeds, cumin, ginger, garlic, and spices. Mix vegetables and cook until dry. Enjoy with roti or bhakri.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स