Join us

आंबा खाल्ल्याने वजन वाढतं का, एका दिवसात किती खावेत? न्यूट्रिशनिस्टने दिला महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:21 IST

आंबा खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. पण अनेकांना वाटतं की, आंबा खाल्ल्यानंतर आपलं वजन वाढतं.

आंबा पाहिला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. आंबा खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. पण अनेकांना वाटतं की, आंबा खाल्ल्यानंतर आपलं वजन वाढतं. त्यामुळेच ते लोक आंबे घरी आणण्यास घाबरतात किंवा कमी आंबे खातात. आरोग्याबाबत प्रत्येकाला चिंता नेहमीच असते. अशा परिस्थितीत, आंब्याबद्दल न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी आंबा खाल्ल्याने वजन वाढतं की नाही हे सांगितलं आहे.

आंबा खाल्ल्याने वजन वाढतं की नाही?

दीपशिखा जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अगदी आरामात आंबे खा. आंब्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. त्यामध्ये फक्त फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात. मात्र हे कमी कॅलरी असलेलं फळ आहे. म्हणूनच तुम्ही आंबा खाऊ शकता. आंबा कमी प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढत नाही आणि मधुमेहही वाढत नाही. फक्त लक्षात ठेवा की, तुम्ही एका वेळी १०० ग्रॅम आंबा खावा.

आंबा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

- आंबा खाणं आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे, ज्यामुळे आरोग्य आणि त्वचा चांगली राहते.

- आंबा खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन ए, सी आणि ई मिळतात आणि त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील चांगल्या प्रमाणात असतं.

- आंबा पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रभावी आहे. यामुळे अपचन, पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर राहतात.

- आंबा हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगला आहे. फायबर, पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास प्रभावी आहे.

- आंबा खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. 

- शरीराला डिटॉक्स करण्यासाठीही काही लोक आंबा खातात. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

टॅग्स :आंबाआरोग्यहेल्थ टिप्स