Join us
Daily Top 2Weekly Top 5

दही की ताक पोटासाठी चांगलं काय? पाहा योग्य पद्धत-ताक कुणी प्यावं आणि दही कुणासाठी चांगलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:48 IST

Buttermilk Vs Curd : दह्यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्स म्हणजेच चांगले बॅक्टेरियाज असतात. जे प्रोटीन,  कॅल्शियम आणि व्हिटामीन मी नं परिपूर्ण असतात.

भारतात अनेकांना पोटाशी संबंधित समस्यांचा सामना  करावा लागतो.  इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, एसिडीटी, ब्लॉटींग, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात.  यामुळे अस्वस्थ वाटणं, पोटात गडबड होणं असे त्रास उद्भवतात. अशावेळी  १ वाटी दही खावं की ताक प्यावं असा प्रश्न अनेकांना पडतो.  दही-ताक हे दोन्ही पदार्थ भारतीयांच्या आहारतील महत्वाचा भाग आहेत (Which Is More Beneficial For Gut Health Curd Or  Buttermilk Know The Right Chice). पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी हे फार महत्वाचे असते. दही आणि ताक हे दोन्ही दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. कोणते पदार्थ जास्त पौष्टीक ठरतात हे तुमच्या शारीरिक गरजा आणि आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते. (Buttermilk Vs Curd)

दही आणि ताकातील पोषक तत्व

दह्यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्स म्हणजेच चांगले बॅक्टेरियाज असतात. जे प्रोटीन,  कॅल्शियम आणि व्हिटामीन मी नं परिपूर्ण असतात. तर ताक पाणी मिसळून तायर केले जाते.  हलके आणि पातळ असते ज्यामुळे ते पोटाला कमी प्रमाणात  जड पडते. यात फॅट्सचे प्रमाण  कमी असते. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. यात  जीरं, हिंग किंवा पुदीना यांसारखे पाचक मसाले मिसळले जातात. ज्यामुळे गॅस-ब्लॉटींग कमी करण्यास मदत होते.

गट हेल्थवर दही आणि ताकाचा कसा परिणाम होतो?

दह्यात गुड बॅक्टेरियाज असतात जे चांगल्या बॅक्टेरियाजची संख्या वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळे गॅसेसच्या त्रासापासून आराम मिळतो आणि पचनक्रियाही चांगली राहते. ज्या लोकांना प्रोटीनची सर्वात  जास्त आवश्यकता  असते.  त्यांच्यासाठी  दही हा उत्तम उपाय आहे. ज्यामुळे दीर्घकाळ पोट  भरलेलं राहतं. दही एक चांगला पर्याय आहे.

ताक थंड आणि हायड्रेटींग असते. जर  तुमचं पोट खूपच भरलेलं  वाटत असेल किंवा एसिडीटीचा त्रास होत असेल तर  तुम्ही ताक पिऊ शकता. यातील प्रोबायोटीक्स आणि पाणी अन्नाचे पचन व्यवस्थित करण्यास मदत करतात. जर कोणालाही इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असेल तर थंड ताक आरामदायक ठरू शकतं. ताक हलके आणि पचायलाही सोपे असते. ताक शरीराला गारवा देते. ज्यामुळे अपचन, एसिडीटीचा त्रास उद्भवत नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Curd or Buttermilk: Which is better for the stomach?

Web Summary : Curd and buttermilk aid digestion. Curd, rich in probiotics and protein, is ideal for those needing sustained energy. Buttermilk, lighter and hydrating, soothes acidity and bloating, especially beneficial for IBS.
टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स