Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोडा वेफर्सचा पुडा नी करा झटपट वेफर्स चाट, १० रुपयांच्या वेफर्सचा ५ मिनिटांत भन्नाट चाट-एकदम चमचमीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2025 16:04 IST

Break the wafers into pieces and make instant wafers chaat, make amazing chaat of 10 rupees wafers in 5 minutes - absolutely delicious : झटपट करा ही रेसिपी. बटाट्याचे वेफर्स लागतात एकदम भारी.

पार्टी, वाढदिवस किंवा घरगुती गेट-टुगेदरमध्ये असे पदार्थ हवेत की जे पटकन होतील आणि सर्वांना आवडतील. दिसायला आकर्षक असतील आणि चवीला वेगळेही वाटतील. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे बटाटा वेफर्स चाट. (Break the wafers into pieces and make instant wafers chaat, make amazing chaat of 10 rupees wafers in 5 minutes - absolutely delicious)साध्या वेफर्सना थोडा हटके टच देऊन तयार होणारी ही चाट डिश पार्टीसाठी एकदम मस्त आणि हिट ठरणारी आहे.पार्टीच्या दृष्टीने पाहिले तर हा पदार्थ स्टार्टर किंवा स्नॅक म्हणून खूपच सोयीचा ठरतो. पचायला फार जड नाही, त्यामुळे जेवणाआधी दिला तरी चालतो आणि चहासोबत दिला तरी चालतो. 

बटाटा वेफर्स चाटचा आणखी एक फायदा म्हणजे त्यात आपल्याला आवडणाऱ्या पद्धतीने, चवींनुसार बदल करता येतात. कोणी कमी तिखट आवडत असेल, तर सौम्य चव ठेवता येते, तर मसालेदार चाट आवडणाऱ्यांसाठी ती अधिक चटपटीत करता येते. त्यामुळे एकाच पदार्थातून वेगवेगळ्या चवींची मजा घेता येते. शिवाय करायला काही मिनिटे लागतात. पाहा सोपी रेसिपी. 

साहित्यबटाटा वेफर्स, लिंबू, तेल, कांदा, कोथिंबीर, कांद्याची पात, लाल तिखट, मीठ, आमचूर, गार्लिक पावडर, ओनियन पावडर 

कृती१. कांदा सोलायचा आणि लांब - लांब चिरुन घ्यायचा. छान ताजी कोथिंबीर आणायची. मस्त बारीक चिरायची. कांद्याची ताजी पात घ्यायची. धुवायची आणि बारीक चिरायची. आवडीचे कोणतेही बटाटा वेफर्स घ्या. फ्लेवर्ड घेतले तरी चालेल पण शक्यतो साधेच घ्या. म्हणजे चव जास्त चांगली लागते.

एका वाटीत थोडे मीठ घ्यायचे. त्यात थोडे लाल तिखट घालायचे. तसेच चमचाभर गार्लिक पावडर म्हणजेच लसूण पूड घालायची. बाजारात मिळते. तसेच थोडी आमचूर पूड घालायची. ओनियन पावडर म्हणजेच कांद्याची पूड मिळते चमचाभर तिचाही वापर करायचा. सगळे मसाले छान एकजीव करायचे. त्यात थोडे तेल घालायचे आणि मिक्स करायचे. 

३. एका परातीत बटाटा वेफर्स घ्यायचे. त्यात लांब - लांब चिरलेला कांदा घालायचा. त्यात कांद्याची पातही घालायची. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तयार केलेला मसाला घालायचा. थोडे तेल घालायचे आणि मिक्स करायचे. मस्त लालसर होते आणि एकदम चविष्ट लागते. त्यात थोडा लिंबाचा रस घालायचा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Quick & tasty wafers chaat: 10-rupee snack in 5 minutes!

Web Summary : Make instant, delicious potato wafers chaat in minutes! Perfect for parties or gatherings, customize with your favorite spices. A quick, light, and flavorful snack.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स