Lokmat Sakhi >Food > काळ्या चण्याची भंडारा स्टाइल सुकी भाजी, कांदालसूण न घालताही होते चमचमीत- करा झटपट

काळ्या चण्याची भंडारा स्टाइल सुकी भाजी, कांदालसूण न घालताही होते चमचमीत- करा झटपट

Black chana Bhandara style recipe, it is delicious even without adding onion and garlic : काळ्या चण्याची ही भाजी पाहा किती मस्त आहे. चवीला छान करायला सोपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2025 18:42 IST2025-05-02T18:41:24+5:302025-05-02T18:42:20+5:30

Black chana Bhandara style recipe, it is delicious even without adding onion and garlic : काळ्या चण्याची ही भाजी पाहा किती मस्त आहे. चवीला छान करायला सोपी.

Black chana Bhandara style recipe, it is delicious even without adding onion and garlic | काळ्या चण्याची भंडारा स्टाइल सुकी भाजी, कांदालसूण न घालताही होते चमचमीत- करा झटपट

काळ्या चण्याची भंडारा स्टाइल सुकी भाजी, कांदालसूण न घालताही होते चमचमीत- करा झटपट

अगदी सोपी अशी काळ्या चण्याची ही सुकी भाजी भंडार्‍यामध्ये खाल्ली असेलच. चवीला अगदी मस्त असते. (Black chana Bhandara style recipe, it is delicious even without adding onion and garlic )पाहा किती सोपी आहे घरी करणे. ना कांदा वापरायचा ना लसूण तरीही अगदी छान होते.  

साहित्य
काळे चणे, पाणी, आलं, जिरे, तमालपत्र, मीठ, तूप, धणे पूड, हळद, लाल तिखट, जिरे पूड, काळी मिरी पूड, चणा मसाला, हिरवी मिरची, आमचूर पूड, कोथिंबीर, हिंग

कृती
१. वाटी भर काळे चणे रात्रभर भिजत घाला. (Black chana Bhandara style recipe, it is delicious even without adding onion and garlic )काळे चणे भिजायला जरा वेळ लागतो. त्यामुळे आदल्या दिवशीच तयारी करायची. 

२. भिजलेले चणे एका कुकरमध्ये घ्या, त्यामध्ये पाणी ओता. चणे मऊ शिजतील एवढे पाणी वापरा. त्यामध्ये चमचाभर तूप घाला. किसलेलं आलं घाला. एक तमालपत्र घाला आणि मीठ ही घाला.  कुकर लावा आणि मस्त चणे शिजवा. चणे व्हायला वेळ लागतो त्यामुळे शिट्या जास्त काढा. 

३. चणे छान मऊ झालेत की नाही ते पाहा. बोटाने चणे तोडून पाहा आरामात पिचकत असतील तर व्यवस्थित शिजले आहेत. एका वाटीमध्ये भरपूरशी जिरे पावडर घ्या. त्यामध्ये धणे पूड घाला. मीठ घाला हळदही घाला. लाल तिखट घाला काळी मिरी पूड घाला. आमचूर पूड घाला. हिंग घाला. सगळे मसाले मिक्स करा. त्यामध्ये थोडे पाणी घाला आणि पेस्ट करुन घ्या. जरा घट्ट अशीच पेस्ट करायची.    

४. एक कढई घ्या. जरा तापवा. गरम झाल्यावर चमचाभर तूप त्यामध्ये घाला. तुपावर जिरे घाला जिरे छान तडतडले की त्या पाण्यात मिसळलेली मसाल्याची पेस्ट ओता. छान परतून घ्या. त्यामध्ये शिजवलेले काळे चणे टाका. हिरवी मिरची तुकडे करुन टाका आणि मस्त एकजीव करुन घ्या. भाजी अगदीच सुकी झाली की त्यामध्ये अगदी थोडे पाणी घाला. एक वाफ काढा. नंतर गॅस मंद करुन ठेवा आणि पाणी आटू द्या. पाणी आटल्यावर मसाले चण्यांना छान लागलेले असतील. मग त्यामध्ये चमचाभर तूप घाला. चणे सुकल्यावर एकदा जरा ढवळून पाहा पाणी सुकल्यावर गॅस बंद करा. 

Web Title: Black chana Bhandara style recipe, it is delicious even without adding onion and garlic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.