Join us

थेंबभरही तेल न वापरता करा कुरकुरीत भेंडी फ्राय, पाहा शेफ कुणाल कपूरची स्पेशल हेल्दी-टेस्टी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2023 09:50 IST

Bhindi fry without oil lady finger fry recipe by chef kunal kapoor : आहारात तेलाचे प्रमाण जास्त असेल तर भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

सतत वेगळी भाजी किंवा जेवणात तोंडी लावायला काय करायचे असा बहुतांश महिलांना प्रश्न असतो.त्याच त्याच भाज्या खाऊनही अनेकदा कंटाळा येतो. अशावेळी आहे त्याच भाज्या थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या तर जेवणाची रंगत वाढायला मदत होते.  भेंडी ही काहींच्या खूप आवडीची असते तर काहींना ती अजिबात आवडत नाही. भेंडीमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे बरेच गुणधर्म असतात.एकच भाजी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असल्याने आणि प्रत्येकाच्या हाताला चव वेगळी असल्याने ही एकच भेंडी आपण ३ ते ४ प्रकारे करु शकतो. तेलावर फ्राय केलेली ही भेंडी मसाला किंवा भरली भेंडी बहुतांश लहान मुलांना आवडते (Bhindi fry without oil lady finger fry recipe by chef kunal kapoor). 

कोणत्याही भाजीला तेल जास्त घातले तर ती चविष्ट होते पण आरोग्यासाठी मात्र हे तेल तितके चांगले नसते. भेंडी फ्राय करायची असेल तर खूप जास्त प्रमाणात तेल लागते. पण आहारात तेलाचे प्रमाण जास्त असेल तर भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच कुरकुरीत भेंडी पण अजिबात तेल न वापरता अशी एक आगळीवेगळी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी ही रेसिपी सांगितली असून ती कशी करायची पाहूया.अगदी चिप्ससारखे लागणारे हे भेंडी फ्राय एकदा कराल तर सगळेच अतिशय आवडीने खातील आणि जेवणाची मजा वाढण्यास नक्कीच मदत होईल. 

(Image : Google)

१. साधारण अर्धा किलो भेंडी घेऊन ती स्वच्छ धुवून, सुकवून घ्यायची.

२. या भेंडीचे चार भाग करुन घ्यायचे. कापताना भेंडीच्या बिया आणि मधला पांढरा भाग पूर्ण काढून घ्यायचा.

३. एका ताटलीवर टिश्यू पेपर ठेवून त्यावर भेंडीचे हे भाग एकसारखे ठेवायचे. 

४. त्यावर थोडं मीठ घालून ही डीश ३ ते ४ मिनीटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवायची. 

५. मायक्रोवेव्हच्या हिटमुळे भेंडी मस्त कुरकुरीत होते.

६. ही भेंडी बाऊलमध्ये घेऊन त्यावर चाट मसाला, चिली फ्लेक्स आणि आपल्या आवडीचे मसाले घालायचे. 

७. अजिबात तेल नसल्याने पथ्य असणारे आणि बाकीचेही ही भेंडी अगदी सहज खाऊ शकतात. 

८. एकदा खाल्ली की ही कुरकुरीत भेंडी खातच राहावी असं वाटतं, इतकी छान लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.भाज्याकुणाल कपूर