भंडाऱ्याचे जेवण म्हणजे एकच नंबर असते. गावोगावी भंडारा भरतो. अगदी मोजके दोन पदार्थ या भंडाऱ्यात जेवणासाठी असतात मात्र त्यासमोर मोठ-मोठे महागडे पदार्थही फिके पडतील. लोकांना भंडाऱ्यात मिळणारी बटाटा भाजी फार आवडते. (Bhandara Style Potato Rassa - A delicious curry without onion-garlic, tasty and easy )या रस्स्यात कांदा नसतो लसूण नसते फार मसाले नसतात तरी तो चवीला अकदम मस्त लागतो. भंडाऱ्यात मिळते तसाच बटाटा रस्सा घरी करणे एकदम सोपे आहे. पाहा काय करायचे.
साहित्य बटाटे, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, तेल, मोहरी,जिरे, हळद, लाल तिखट, धणे पूड, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर, पाणी
कृती १. बटाटे स्वच्छ धुवायचे आणि सोलून घ्यायचे. बटाट्याचे जाडसर तुकडे करा. भंडाऱ्यात मिळणारा रस्सा हा नेहमी थोडा पातळसर आणि झणझणीत चवीचा असतो, म्हणून मसाले नीट परतणे आणि पाणी योग्य प्रमाणात घालणे गरजेचे असते. बटाट्याचे जाडसर तुकडे मसाल्यात जास्त छान मिक्स होतात. त्याचा लगदा होत नाही.
२. कढईत थोडे तेल गरम करुन त्यात मोहरी घाला, मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे घालून मस्त फोडणी तयार करा. नंतर त्यात किसलेलं आलं घाला आणि हिरव्या मिरचीचे तुकडेही घाला. छान परतून घ्या. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि मऊ होईपर्यंत शिजवा. टोमॅटो छान शिजल्यावर त्यात रंगासाठी हळद, चमचाभर लाल तिखट, चमचाभर धणे पूड आणि चवी पुरते मीठ घालून मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. मसाला छान खमंग परता.
३. मसाला छान परतला गेल्यावर त्यात बटाट्याचे तुकडे घालून नीट ढवळून घ्यायचे. बटाटे मसाल्यावर दोन मिनिटे परतून घ्यायचे. दोन कप पाणी घालून झाकण ठेवून बटाटे शिजेपर्यंत रस्सा मंद आचेवर शिजवायचा. बटाटे मऊसर झाले की त्यात गरम मसाला घालून चव पाहून मीठाचा अंदाज घ्या. पाणी नंतर घातल्यामुळे कदाचित जास्तीचे मीठ लागू शकते. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्यांश खा.
हा रस्सा साधा पण खूपच चविष्ट लागतो. पूर्यांसोबत त्याची जोडी भारी जमते. कांदा-लसूण न घालता केलेला असल्याने तो हलका, पचायला सोपा आणि प्रसाद किंवा व्रतामध्येही खाण्यास योग्य ठरतो.
Web Summary : Enjoy a flavorful, onion-garlic free Bhandara-style potato curry. This easy recipe uses simple ingredients like potatoes, tomatoes, and spices. Perfect with puris!
Web Summary : प्याज-लहसुन मुक्त भंडारा-शैली आलू करी का आनंद लें। इस आसान रेसिपी में आलू, टमाटर और मसालों जैसी सरल सामग्री का उपयोग किया गया है। पूरियों के साथ परोसें!