Lokmat Sakhi >Food > आंबट-गोड आवळ्यांचा मौसम आला, पाहा वेगवेगळ्या पद्धतीनं कसे खाता येतील आवळे

आंबट-गोड आवळ्यांचा मौसम आला, पाहा वेगवेगळ्या पद्धतीनं कसे खाता येतील आवळे

Amla Benefits : आवळ्यातून व्हिटामिन सी आणि भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स मिळतात. ज्यामुळे इम्यूनिटी वाढते आणि अनेक आजारांपासून धोकाही टळतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 10:54 IST2025-09-23T10:53:24+5:302025-09-23T10:54:02+5:30

Amla Benefits : आवळ्यातून व्हिटामिन सी आणि भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स मिळतात. ज्यामुळे इम्यूनिटी वाढते आणि अनेक आजारांपासून धोकाही टळतो.

Best way to eat amla, delicious amla recipes | आंबट-गोड आवळ्यांचा मौसम आला, पाहा वेगवेगळ्या पद्धतीनं कसे खाता येतील आवळे

आंबट-गोड आवळ्यांचा मौसम आला, पाहा वेगवेगळ्या पद्धतीनं कसे खाता येतील आवळे

Amla Benefits : अनेक ठिकाणी पाऊस सुरू असला तरी थंडीचे दिवस जवळ आले आहेत. त्यामुळे बाजारात सगळीकडे हिरवे आवळे दिसू लागले आहेत. गोड - आंबट चवीचे आवळे खाणं सगळ्यांना आवडतं. पण फक्त कच्चा आवळा खाण्याऐवजी आपण आवळ्याचे वेगवेगळे पदार्थही (Amla Recipes) खाऊ शकता. महत्वाची बाब म्हणजे आवळे कसेही खाल्ले तरी त्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्यामुळेच तर आवळ्याला सुपरफूड मानलं जातं. कारण यातून व्हिटामिन सी आणि भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स मिळतात. ज्यामुळे इम्यूनिटी वाढते आणि अनेक आजारांपासून धोकाही टळतो. त्यामुळे आवळे कसे कसे खाता येतील हेच आज आपण पाहणार आहोत.

आवळ्याची चटणी

आंबट-गोड टेस्ट असलेल्या आवळ्याची आपण चटणी खाऊ शकता. ही चटणी इतकी टेस्टी असते की, कशासोबतही खाल किंवा जेवणासोबत अशीही खाल. ही चटणी करण्यासाठी आवळ्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, लसूण टाकून बारीक करा. यात थोडं मीठ घाला. आणखी आंबट हवं असेल तर यात थोडा लिंबाचा रसही टाकू शकता. ही चटणी एकदा जर आपण खाल तर याची चव कधीही विसरू शकणार नाही.

आवळ्याची कॅंडी

आवळ्यांची कॅंडी सुद्धा बनवू शकता. जी लहान मुलांना खूप आवडेल. याचा फायदा असा की, लहान मुलं थेट आवळे खात नसतील तर निदान कॅंडीच्या माध्यमातून त्यांच्या पोटात जाईल. कॅंडी तयार करण्यासाठी आवळ्याचे छोटे छोटे स्पाइस करा. यावर साखर किंवा गूळ लावा. त्यानंतर आवळे सुकू द्या. हे आवळे खायला गोड, आंबट लागतील. यावर हलकं मीठ टाकून खाल तर टेस्ट आणखी वाढेल. 

हनी शॉट्स

जर आपण रोज सकाळी मधाचं पाणी पित असाल तर त्यात आवळ्याचा रसही मिक्स करा. आवळा बारीक करून त्याचा ज्यूस बनवा किंवा आवळा उकडून त्याचं पाणीही पिऊ शकता. फक्त या पाण्यात आवळ्याचे रसाचे काही थेंब टाका. यातून आपल्याला भरपूर व्हिटामिन सी आणि अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स मिळतील.

आवळ्याचं सूप

वेगवेगळ्या प्रकारचे सूप आपण प्यायले असाल. पण आवळ्याचं सूप फारच टेस्टी आणि वेगळं ठरतं. आवळ्याचं गरमागरम सूप सकाळी किंवा दुपारी कधीही पिऊ शकता. हे तयार करण्यासाठी आवळे कापून घ्या. जेवढं सूप बनवायचंय तेवढंच पाणी घ्या आणि त्यात आवळ्याचे तुकडे टाका. सूप टेस्टी बनवण्यासाठी त्यात आल्याचे काही तुकडे आणि थोडा बारीक केलेला लसूण घाला. हे सूप शरीरासाठी खूप हेल्दी असतं.

आयुर्वेदात आवळ्यात खूप महत्वं आहे. पण अनेकांना आवळा खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. आयुर्वेद Dr. Nambi Namboodiri यांनी आवळ्या खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. डॉक्टरांनुसार, आवळे नेहमी मिठासोबत खावेत.

मीठ आणि आवळ्याचे फायदे

आयुर्वेदात एकूण ६ रस आहेत. डॉक्टरांनुसार, आवळ्यामध्ये खारट सोडून सगळे रस असतात. त्यामुळे मिठासोबत ते खावेत. मिठासोबत आवळा खाल्ल्यास तो संपूर्ण बनतो आणि त्याचा आंबटपणाही बॅलन्स होतो. तसेच आवळ्यात फायदेही अधिक वाढतात.

आवळा खाण्याचे फायदे

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

पचनक्रिया सुधारते

हृदयाचं आरोग्य सुधारतं

रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं

त्वचेचं आरोग्य सुधारतं

डोळ्यांसाठी फायदेशीर

वजन कमी करण्यास मदत मिळते

केसांची वाढ होते

वेदना कमी होतात

हाडे व दात मजबूत करतात

Web Title: Best way to eat amla, delicious amla recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.