कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी असलेलं दूध हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी वरदान आहे, परंतु पालकांच्या मनात नेहमीच एक प्रश्न असतो, सकाळी दूध देणं चांगलं की रात्री? तुमच्या मुलाला दूध देण्याची सर्वोत्तम वेळ कोणती हे जाणून घेऊया. डॉक्टर आणि हेल्थ एक्सपर्ट्स म्हणतात की, खरा फरक दूध देण्याच्या वेळेमुळे नाही तर तुम्ही त्यांना कधी आणि कसं दूध देता यावरून पडतो.
पेडियाट्रिक एक्सपर्ट्सनुसार, दूध लहान मुलांच्या शरीरासाठी चांगलं असतं. विशेषतः जे कमी खातात त्यांच्यासाठी. मात्र दिवसभर थोडं थोडं दूध पिणं योग्य नाही. यामुळे भूक कमी होऊ शकते, दात किडतात आणि जास्त कॅलरीजचं सेवन होऊ शकतं. मुलांना दूध देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे खाण्यासोबत किंवा फिक्स स्नॅक टाईमवर देणं. जेवणाच्या दरम्यान मुलांना फक्त पाणी द्या.
सकाळी दूध पिण्याचे फायदे
सकाळी दूध दिल्यामुळे मुलांना दिवसाची सुरुवात करण्यासाठी चांगली ऊर्जा मिळते. दुधातील प्रोटीन त्यांना लक्ष केंद्रित करण्यास मदत करतं आणि त्यांना लवकर भूक लागण्यापासून रोखतं. जर तुमचं मूल जेवत नसेल, तर डॉक्टर त्यांना आधी नाश्ता देण्याची आणि नंतर एक छोटासा कप दूध देण्याची शिफारस करतात.
रात्री दुधाचे पिण्याचे फायदे
बऱ्याच घरांमध्ये रात्री कोमट दूध देणं ही एक सवय आहे. दुधात ट्रिप्टोफॅन असतं, जो रिलॅक्स करण्यास मदत करतो. जरी याला समर्थन देण्यासाठी फारसे वैज्ञानिक पुरावे नसले तरी ते मुलांना रिलॅक्स करतं. हे लक्षात ठेवा की, मुलांना बाटलीतून दूध दिल्यास दातांचं नुकसान होऊ शकतं. मुलांना कपमध्ये दूध देणं चांगलं आहे.
या चुका टाळा
- मुलांना दिवसभर दूध पिऊ देऊ नका.
- जास्त दूध भूक कमी करू शकते आणि आयर्नची कमतरता निर्माण करू शकते.
- जास्त दूध प्यायल्याने दात खराब होतात
- फक्त ठराविक वेळी दूध प्या.
तुम्ही सकाळी दूध द्या की रात्री दूध द्या हे तुमच्या आवडी आणि तुमच्या मुलाच्या सवयींवर अवलंबून असतं. तुम्ही त्यांना किती दूध देता आणि वेळ निश्चित आहे की नाही याचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. . एक फिक्स्ड रुटीन ठेवा आणि तुमच्या मुलाला बॅलेन्स डाएट घेण्यास प्रोत्साहित करा.
