छोले, राजमा किंवा इतर कडधान्यांच्या उसळ नेहमीच खायला पाहिजेत. कारण त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि इतरही अनेक पौष्टिक घटक मिळतात. हे पदार्थ सगळ्यांना आवडतात सुद्धा. पण नेमकी अडचण अशी येते की आपण ते पदार्थ भिजत घालायलाच विसरून जातो. छोले भटुरे, राजमा किंवा चवळीची उसळ, हरबऱ्याची उसळ असं काहीही करायचं असेल तर सगळ्यात आधी ते आपल्याला कमीतकमी ८ ते ९ तासांसाठी भिजत घालावे लागतात (best trick to soak rajma, chole and other sprout instantly). आणि आपण नेमकं तेच विसरलो की आपला कडधान्याचा बेत पुन्हा पुढे ढकलला जातो आणि मग ते नियमितपणे खाण्यात येत नाहीत. त्यासाठीच ही ट्रिक पाहा आणि झटपट कडधान्य भिजवा..(how to soak rajma, chole in 2 hours?)
कमीतकमी वेळात छोले, राजमा कसे भिजवायचे?
याविषयीची एक खूपच सोपी ट्रिक swadcooking या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
यामध्ये असं सांगितलं आहे की छोले, राजमा किंवा इतर जी कोणती कडधान्ये तुम्हाला भिजत घालायची आहेत ती एकदा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर गॅसवर पाणी गरम करायला ठेवा.
गूळ- तूप खाण्याचे ८ जबरदस्त फायदे! वय वाढलं तरी त्वचा दिसेल तरुण- तब्येत राहील ठणठणीत
जेव्हा पाण्याला उकळी येईल तेव्हा गॅस बंद करा. आता हे गरमागरम पाणी एखाद्या हॉटपॉटमध्ये घाला. त्या पाण्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा घाला. सोडा पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळला गेला की मग त्यात धुूवून घेतलेले हरबरे, राजमा किंवा इतर कोणतेही कडधान्य भिजायला घाला.
हॉटपॉटचं झाकण पक्कं लावून घ्या आणि त्यानंतर साधारण २ तासांत हरबरे छान मऊसूत भिजलेले असतील.
हे सुद्धा लक्षात घ्या..
व्हिडिओ शेअर करणाऱ्या शेफ असं सांगत आहेत की कोणतेही कडधान्य रात्रभर पाण्यात भिजत घालण्याची गरज नसते. कारण असे केल्यामुळे त्यातील प्रोटीन्स आणि इतर पौष्टिक घटक पाण्यात मिसळतात. त्यामुळे कडधान्य भिजविण्यासाठी नेहमी हीच पद्धत वापरावी.
ब्लाऊजच्या मागच्या गळ्यावर करा स्टोन वर्क- थ्रेड वर्क, ८ युनिक डिजाईन्स- साडीत दिसाल आणखी सुंदर
त्याउलट बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आपली पुर्वापार चालत आलेली पद्धतच अधिक योग्य असून या पद्धतीमुळे अतिरिक्त बेकिंग सोडा आपल्या पोटात जातो. त्यामध्ये असणारं सोडियम तब्येतीसाठी चांगलं नाही. त्यामुळे कधीतरीच या पद्धतीने कडधान्ये भिजवावीत. अन्यथा आपली नेहमीचीच पद्धत वापरावी.