रोज रोज नाश्त्याला काय करायचं ते सुचत नाही. तुम्ही सोप्या पद्धतीनं बेसन इडली करू शकता. ही सोपी इडली करायला डाळ, तांदूळ भिजवणं, वाटणं अशी काहीही प्रक्रिया करावी लागत नाही (Cooking Hacks). अगदी झटपट ही इडली बनते. बेसन इडली चवीला अतिशय चविष्ट आणि पौष्टीक असते. ही इडली करण्यासाठी तांदूळ किंवा डाळ भिजवण्याची गरज नसते. यामुळे ती झटपट तयार होते. (How To Make Besan Idli)
बेसन इडली करण्यासाठी सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये २ वाट्या बेसन चाळून घ्या. जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. यामध्ये अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि थोडं लाल तिखट घाला. आता यात थोडं पाणी घालून मध्यम स्वरूपाचं मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावं. हे मिश्रण १० ते १५ मिनिटं झाकून ठेवा. जेणेकरून बेसन व्यवस्थित फुलेल. (Cooking Hacks Besan Idli Recipe)
पुढच्या टप्प्यात गॅसवर इडली पात्र गरम करायला ठेवा. यात पाणी घाला. इडलीच्या साच्यांना थोडं तेल लावून ग्रीस करून घ्या. तयार बेसनाच्या मिश्रणात एक चमचा इनो किंवा खाण्याचा सोडा घाला त्यावर थोडं पाणी घालून ते एकाच दिशेनं हलक्या हातान फेसा. इनो घातल्यामुळे इडली छान मऊ, जाळीदार होते मिश्रण फेसाळल्यानंतर लगेच ते इडलीच्या साच्यात भरा. इडली पात्रामध्ये हे साचे ठेवून मध्यम आचेवर साधारण १० ते १२ मिनिटं वाफवून घ्या.
इडली वाफवून होईपर्यंत तुम्ही फोडणीची तयारी करू शकता. एका लहान कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरं, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे थोडा हिंग घाला. इडली तयार झाल्यावर ती थंड होऊ द्या. मग साच्यातून बाहेर काढा.
या तयार इडल्यांवर वरून तयार केलेली खमंग फोडणी घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, ओलं खोबरं घालून सजवा. ही गरमागरम बेसन इडली तुम्ही पुदिन्याची चटणी, खोबर्याची चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता. ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे.
Web Summary : Prepare soft, fluffy besan idlis quickly with this easy recipe. No soaking or grinding required. Simply mix besan with curd, spices, and a leavening agent, steam, and temper. A healthy, filling breakfast ready in minutes!
Web Summary : इस आसान रेसिपी से नरम, फूला हुआ बेसन इडली जल्दी से बनाएं। भिगोने या पीसने की आवश्यकता नहीं है। बस बेसन को दही, मसालों और खमीर के साथ मिलाएं, भाप लें और तड़का लगाएं। मिनटों में तैयार एक स्वस्थ, तृप्तिदायक नाश्ता!