Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > बंगाली पुचका करतो चवीची जादू, पाणीपुरीचा भाऊ आणि तुम्ही म्हणाल सांगा किती खाऊ! पाहा अस्सल पुचका रेसिपी

बंगाली पुचका करतो चवीची जादू, पाणीपुरीचा भाऊ आणि तुम्ही म्हणाल सांगा किती खाऊ! पाहा अस्सल पुचका रेसिपी

Bengali Puchka tastes so good , See the authentic Puchka recipe, must try : चविष्ट आणि करायला सोपा असा पुचका नक्की खाऊन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2026 13:28 IST2026-01-22T13:25:07+5:302026-01-22T13:28:17+5:30

Bengali Puchka tastes so good , See the authentic Puchka recipe, must try : चविष्ट आणि करायला सोपा असा पुचका नक्की खाऊन पाहा.

Bengali Puchka tastes so good , See the authentic Puchka recipe, must try | बंगाली पुचका करतो चवीची जादू, पाणीपुरीचा भाऊ आणि तुम्ही म्हणाल सांगा किती खाऊ! पाहा अस्सल पुचका रेसिपी

बंगाली पुचका करतो चवीची जादू, पाणीपुरीचा भाऊ आणि तुम्ही म्हणाल सांगा किती खाऊ! पाहा अस्सल पुचका रेसिपी

तुम्ही जर पाणीपुरीचे चाहते असाल तर तुम्हाला पुचका नक्कीच आवडेल. अनेकांना हे दोन पदार्थ सारखेच वाटतात मात्र त्याच्या मसाल्यात जरा फरक असतो. दोन्ही एकदम चटपटीत असतात. पुचक्याची खासियत म्हणजे त्याची चव. एका घासात तिखट, आंबट, खारट आणि हलकी गोड चव एकत्र अनुभवता येते. (Bengali Puchka tastes so good , See the authentic Puchka recipe, must try )त्यामुळेच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पुचका आवडतो. यामध्ये रगडा नाही तर बटाटा आणि काळे चणे असतात. बंगालमध्ये पुचका फारच लोकप्रिय आहे. तसेच इतरही अनेक राज्यांत आवडीने खाल्ला जातो. करायला अगदी सोपा असतो. त्यामुळे एकदा नक्की करुन पाहा. 

साहित्य 
बटाटा, काळे चणे, मीठ, पाणी, धणे, जिरे, काश्मीरी लाल मिरची, चिंच, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, लाल तिखट, लिंबू, पाणीपुरीच्या पुऱ्या 

कृती
१. कुकरमध्ये बटाटा, काळे चणे आणि मीठ घ्या. त्यात पाणी ओता आणि कुकर लावा. चणे आणि बटाटा मस्त शिजेल याची काळजी घ्या. नंतर कुकर उघडला की बटाट्याची साले काढून घ्या, बटाटा कुस्करुन घ्यायचा. काळे चणेही कुस्करायचे.

२. एका पॅनमध्ये थोडे धणे तेवढेच जिरे आणि काश्मीरी लाल मिरची घ्यायची, व्यवस्थित भाजायची. नंतर गार करायचे आणि त्याची पूड तयार करायची. एका भांड्यात गरम पाणी घ्या. त्यात चिंच भिजवायची. हाताने कुस्करायची आणि गाळून घ्यायची. 

३. एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घ्यायची. त्यात पुदिना घालायचा तसेच थोडे पाणी घालायचे आणि मस्त पेस्ट तयार करायची. चिंचेचं पाणी आणि हिरवी चटणी मिक्स करायची. त्यात तयार केलेला मसाला घालायचा. तसेच लाल तिखट घालायचे. लिंबू पिळायचा. थोडे हिरवे पाणी घालायचे आणि मसाला हाताने कुस्करुन एकजीव करायचा. 

४. हिरवी चटणी आणि चिंचेचे पाणी एकत्र करायचे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. तयार केलेला मसाला घालायचा आणि पाणी ओतून पातळ करायचे.  पाणीपुरीच्या पुरीत मसाला भरुन पाणी ओतायचे. फार चविष्ट लागते.  

Web Title : बंगाली पुचका: पानीपुरी का स्वादिष्ट रूप, आसान रेसिपी!

Web Summary : पुचका, पानीपुरी जैसा एक बंगाली स्ट्रीट फूड, एक अनोखा स्वाद प्रदान करता है। इस रेसिपी में आलू और काले चने का उपयोग किया जाता है, जिसे मसालों, इमली और पुदीने के मिश्रण से सीज़न किया जाता है। यह एक सरल और स्वादिष्ट नाश्ता है जो सभी को पसंद है।

Web Title : Bengali Puchka: A Flavorful Twist on Panipuri – Easy Recipe!

Web Summary : Puchka, a Bengali street food similar to panipuri, offers a unique taste. This recipe uses potatoes and black chickpeas, seasoned with a blend of spices, tamarind, and mint. It's a simple and delicious snack loved by all.