Join us

सेलिब्रिटींसह जेन झी झाली 'माचा टी'साठी पागल? आहे काय हा चहा, भारतात किंमत किती..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 19:28 IST

What is Matcha Tea : इतर कोणत्याही टी पेक्षा या माचा ग्रीन टी चे फायदे अधिक आहेत. इतकंच नाही तर ही टी बनवण्याची पद्धतही वेगळी आहे.  

What is Matcha Tea : फिटनेसची काळजी घेणाऱ्या लोकांमध्ये आजकाल माचा ग्रीन टी ची क्रेझ चांगलीच वाढली आहे. आपणही सोशल मीडियावर माचा ग्रीन टी बाबत काहीना काही पाहिलं असेल किंवा वाचलं असेल. असं सांगितलं जातं की, इतर कोणत्याही टी पेक्षा या माचा ग्रीन टी चे फायदे अधिक आहेत. इतकंच नाही तर ही टी बनवण्याची पद्धतही वेगळी आहे. अमेरिका, जपान आणि चीनसारख्या देशांमध्ये माचा ग्रीन टी खूप पसंत केली जाते. 

काय आहे Matcha Tea?

माचा टी एकप्रकारची ग्रीन टी आहे, जी शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. जपानमध्ये याचा जास्त वापर होतो आणि जपान इतर देशांमध्ये ही टी सप्लाय करतो. जपानसोबतच माचा टी ची डिमांड अमेरिकेतही खूप वाढली आहे. जपानसोबतच चीनमध्ये सुद्धा याचं उत्पादन घेतलं जातं. पण जपानी टी ची क्वालिटी अधिक चांगली मानली जाते. माचासाठी कॅमेलिया सायनेंसिस नावाच्या झाडाच्या पानांपासून पावडर तयार केलं जातं. 

माचा टी ची किंमत

माचा टी पावडर जगातील सगळ्यात महागड्या टीपैकी एक आहे. भारतात याची किंमत 1 लाख रूपये प्रतिकिलोपासून सुरू होते. काही ऑनलाईन स्टोर्सवर आपल्याला 50 ग्रॅम माचा ग्रीन टी आपल्याला साधारण 600 रूपयांमध्ये मिळू शकेल. 

माचा टी पिण्याचे फायदे

- माचा टीमध्ये अ‍ॅ पिगॅलो कॅटेचिन गॅलेट नावाचं तत्व असतं. ज्यामुळे पचन तंत्र मजबूत होतं. नियमितपणे माचा टी प्यायल्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. अशात आपल्याला शरीरात वाढलेलं फॅट कमी करण्यास मदत मिळते.

- माचा टीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स भरपूर असतात. तसेच याचा कॅटेचिन नावाचं एक प्लांट बेस्ड तत्व असतं. जे शरीरातील विषारी तत्वांना नष्ट करून बाहेर काढतं. 

- माचा टी मेंदूसाठी देखील खूप फायदेशीर असते. यात कॅफीन आणि एल-थीनिन नावाचं अमिनो अ‍ॅसिड असतं. एल-थीनिनमुळे मेंदूला आराम मिळतो आणि फोकस करण्यास मदत मिळते.

- माचा टी लिव्हरसाठी सुद्धा फायदेशीर मानली जाते. यात लिव्हरसाठी फायदेशीर क्लोरोफिल असतं, ज्यामुळे शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. अशात लिव्हरचं काम आणखी सुधारतं.

- अनेक संशोधनातून समोर आलं आहे की, माचा टीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट्स आणि अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण भरपूर असतात. अशात या तत्वांनी शरीरात वाढलेली सूज कमी करण्यास मिळते. ज्यामुळे हृदयरोगांचा धोका टळतो.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य