उन्हाळ्यातली लोकप्रिय फळं म्हणजे टरबूज आणि खरबूज. खरबुजामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. तसंच त्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. त्यामुळे अगदी मधुमेहापासून ते वेटलॉस करणाऱ्या मंडळींपर्यंत सगळ्यांनाच खरबूज चालतं. खरं तर खरबुजाएवढेच फायदे त्याच्या छोट्याशा बियांमधूनही मिळतात. पण आपण त्या सरळ कचऱ्यात टाकून देतो. म्हणूनच आता पुढे सांगितलेले खरबुजाच्या बियांचे फायदे वाचा (benefits of eating muskmelon seeds) आणि त्याचं थंडगार सरबत करून प्या. (how to make muskmelon seeds sharbat or muskmelon seed lemonade?)
खरबुजाच्या बियांचं सरबत करण्याची रेसिपी
खरबूज अर्ध चिरल्यानंतर त्याच्या बिया आणि आजूबाजूचा थोडासा भाग काढून घ्या आणि मिक्सरमध्ये घाला.
यानंतर त्यामध्ये थोडासा गूळ, थोडंसं काळं मीठ आणि थोडासा लिंबाचा रस घाला.
आता हे सगळे पदार्थ मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्या आणि नंतर गाळणीने गाळून घ्या. आता तयार झालेल्या सरबतामध्ये बर्फ घातला की खरबुजाच्या बियांचं गारेगार सरबत झालं तयार... हे सरबत खूप पौष्टिक असतं. त्याने आरोग्याला नेमके कोणते लाभ होतात ते पाहा..
खरबुजाच्या बिया खाण्याचे फायदे
खरबुजाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम तसेच भरपूर ॲण्टीऑक्सिडंट्स असतात.
खरबुजाच्या बियांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे पचनक्रिया चांगली होण्यासाठी त्यांची मदत होते.
या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड असल्याने ते हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.
व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही खरबुजाच्या बिया उपयुक्त ठरतात.
Web Summary : Don't discard muskmelon seeds! They're packed with vitamins, minerals, and antioxidants. This recipe shows how to easily make a refreshing and nutritious sharbat (drink) using these seeds, offering benefits like improved digestion and heart health.
Web Summary : खरबूजे के बीज को बेकार न समझें! ये विटामिन, खनिजों और एंटीऑक्सीडेंट से भरपूर होते हैं। यह रेसिपी दिखाती है कि इन बीजों का उपयोग करके आसानी से एक ताज़ा और पौष्टिक शरबत (पेय) कैसे बनाया जाए, जो बेहतर पाचन और हृदय स्वास्थ्य जैसे लाभ प्रदान करता है।