Jaggery Benefits: गूळ जवळजवळ प्रत्येक घरात असतो. तो फक्त नैसर्गिक गोडवा देणारा पदार्थ नसून एक सुपरफूड मानला जातो. गूळ खाल्ल्यानं शरीरातील अनेक लहान-मोठ्या समस्या दूर होतात. खासकरून हिवाळ्यात गूळ खाल्ल्यानं जेवणाची टेस्ट वाढते आणि शरीर आतून उबदार राहतं. प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांनी त्यांच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये रोज गूळ खाण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. चला जाणून घेऊया गूळ खाण्याचे फायदे, योग्य प्रमाण आणि योग्य वेळ.
गूळ खाण्याचे जबरदस्त फायदे
शरीर शुद्ध आणि स्वच्छ ठेवतो
गूळ शरीराला आतून डिटॉक्स करण्यात मदत करतो. यामुळे लिव्हर साफ राहतं आणि रक्त शुद्ध होतं.
पचन सुधारतो
गूळ डायजेस्टिव एन्झाइम्स सक्रिय करतो, ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते. पोट फुगणं आणि अॅसिडिटीसारख्या समस्या दूर होतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढवतो
हिवाळ्यात शरीराची इम्युनिटी कमी होते, अशा वेळी गूळ खाणं अत्यंत फायद्याचं ठरतं. तो शरीराला इन्फेक्शनपासून संरक्षण देतो.
बद्धकोष्ठता दूर करतो
ज्यांना बद्धकोष्ठता आहे म्हणजे ज्यांचं पोट रोज साफ होत नाही. त्यांनी रोज थोडासा गूळ खावा. गुळाने आतड्या स्वच्छ करण्यास मदत मिळते आणि पोट सहजपणे साफ होतं.
आयर्न भरपूर मिळतं
गुळामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं. यामुळे हिमोग्लोबिनची लेव्हल वाढते. खासकरून ज्या महिलांना अॅनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता आहे त्यांनी गूळ नक्की खावा.
किती गूळ खावा?
डॉ. सलीम यांच्या मते, दिवसाला १० ते २० ग्रॅम गूळ म्हणजेच एक छोटासा तुकडा पुरेसा आहे. जास्त गूळ खाल्ल्यास ब्लड शुगर वाढू शकतो आणि वजन वाढण्याची शक्यता असते.
डायजेशनसाठी गूळ कसा खावा?
एक चमचा तुपासोबत गूळ खाल्ल्यास पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठता दूर होते. तसेच गूळ खाल्ल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यानेही फायदा होतो.
खोकला-जुलाब किंवा सर्दीसाठी उपाय
जर खोकला, सर्दी किंवा छातीत कफ असेल, तर गुळात किसलेले आलं मिसळून खावे. यामुळे इम्युनिटी मजबूत होते आणि श्वसनासंबंधी त्रास कमी होतो.
