Join us
Daily Top 2Weekly Top 5

महागड्या फळांपेक्षा कित्येक पटीने जास्त पौष्टिक आहे पेरू! 'हे' फायदे वाचाल तर रोज आठवणीने खाल.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2025 09:40 IST

Benefits of Eating Guava in Winter: हिवाळ्यात मिळणारे पेरू आवर्जून खायलाच हवेत. कारण कित्येक महागड्या फळांपेक्षाही पेरू जास्त पौष्टिक आहेत..(health benefits of guava)

ठळक मुद्देपेरू हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत आहे, हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यातून व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी देखील चांगल्या प्रमाणात मिळतं. 

हिवाळा आला की गाजर, मुळा, बोरं, मटार, हिरव्या पालेभाज्या यांची बाजारात रेलचेल असते. त्या यादीत आणखी एक नाव येतं आणि ते म्हणजे पेरू. हल्ली कोणतंही फळ कोणत्याही ऋतूमध्ये मिळायला लागलं आहे. पण पेरूचा खरा ऋतू असतो तो हिवाळा. त्यामुळे या दिवसांत येणारे पेरू हमखास खायलाच हवे (health benefits of guava). पेरू खाण्याचे नेमके फायदे कोणते ते एकदा जाणून घेतले तर तुम्हीही इतर सगळी महागडी फळं विसरून जाल (5 amazing health benefits of eating guava) आणि हिवाळ्यातल्या या स्वस्तात मस्त फळावर यथेच्छ ताव माराल..

 

पेरू खाण्याचे फायदे

१. पेरूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. राेगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप गरजेचं असतं. बऱ्याच जणांना हा गैरसमज असतो की संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी सगळ्यात जास्त असते. पण पेरू संत्रीच्याही पुढे असून संत्रीपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी पेरुमध्ये आहे. 

तुम्हाला घर टापटीप, स्वच्छ ठेवण्याची आवड आहे की 'हा' गंभीर आजार? वाचा एक्सपर्ट काय सांगतात..

२. डॉ. साकेत गोयल यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार पेरूमधून प्रोटीन्सही चांगल्या प्रमाणात मिळतात. जवळपास एका पेरूमधून ३ मिलीग्रॅम प्रोटीन्स मिळतात तर एका सफरचंदातून ०. ३ मिलीग्रॅम एवढे प्रोटीन्स मिळतात. 

 

३. पेरूमध्ये फ्लेवोनाईड्स आणि ॲण्टीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही पेरुची मदत होते.

वेटलॉससाठी पिरॅमिड वॉकिंंग करण्याचा जबरदस्त ट्रेण्ड- हे कसं करायचं आणि त्याचे काय फायदे?

४. पेरूमधून पोटॅशियम, मॅग्नेशियमही चांगल्या प्रमाणात मिळते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी, स्नायूंच्या आरोग्यासाठीही पेरू खाणं फायदेशीर मानलं जातं.

५. पेरू हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत आहे, हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यातून व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी देखील चांगल्या प्रमाणात मिळतं. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Guava: A nutritional powerhouse, healthier than expensive fruits, eat daily!

Web Summary : Guava, a winter fruit, is rich in Vitamin C, proteins, and antioxidants. It boosts immunity, supports heart health, regulates blood pressure, and aids muscle health. Guava also provides Vitamin A and B, making it a highly nutritious and beneficial fruit to include in your diet.
टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्सहिवाळाहिवाळ्यातला आहारफळे