Dates Benefits for Women : थंडीच्या दिवसांमध्ये खजूर खाणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, खजूर महिलांसाठी आणखी जास्त फायदेशीर ठरू शकतात? रोज २–३ खजूर खाल्ल्यास महिलांच्या शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसू शकतात. पण अनेकांना यांच्या फायद्यांबाबत फारशी माहितीच नसते. चला जाणून घेऊया महिलांनी हिवाळ्यात रोज खजूर खाल्ल्यास कोणते-कोणते फायदे होतात.
१. नैसर्गिक ऊर्जा मिळते
घर, काम आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे महिलांना थकवा येणे सामान्य आहे. खजूरामध्ये नैसर्गिक शुगरअसते जी लगेच ऊर्जा देते. तसेच भरपूर आयर्न असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं व अॅनिमियापासून बचाव होतो.
२. हाडे मजबूत होतात
महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका पुरुषांपेक्षा अधिक असतो. खजूरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस आणि व्हिटॅमिन K असतं, जे हाडांच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. रोज खजूर खाल्ल्याने हाडांची घनता टिकून राहण्यास मदत होते.
३. त्वचा आणि केसांसाठी वरदान
खजूरमधील व्हिटामिन C आणि व्हिटामिन D त्वचेची इलास्टिसिटी वाढवतात आणि सुरकुत्या कमी करतात. त्यातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला फ्री-रॅडिकल्सपासून संरक्षण देतात. आयर्न व व्हिटामिन-B मुळे केस गळणे कमी होते, आणि केस अधिक मजबूत व चमकदार होतात.
४. पचन सुधारते
खजूर हा फायबरचा उत्तम स्रोत आहे. यामुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि आंतड्यांतील चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. यामुळे पोटाच्या तक्रारी कमी होतात.
५. हार्मोनल बॅलन्स व मूड सुधारणा
खजूरमध्ये असलेले व्हिटामिन B6 आणि मॅग्नेशियम हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात.
यामुळे PMS चे लक्षणे कमी होतात. तसेच हे सेरोटोनिन वाढवून मूड सुधारते आणि ताण कमी करते.
६. खजूर आहारात कसे घ्यावे?
रोज२–४ खजूर पुरेसे असतात.
सकाळच्या नाश्त्यात दूधासोबत किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता.
मात्र डायबिटीसचे रुग्ण आणि गर्भवती महिला यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच खजूर आहारात समाविष्ट करावा.
