Boiled Rice Water Benefits : भारतीय घरांमध्ये रोज भरपूर भात खाल्ला जातो. पण तांदळाच्या पाण्याकडे फारसं कुणी लक्षच देत नाहीत. अनेकांना हे माहीत नसेल की, तांदळाच्या पाण्याला आयुर्वेदात अमृतासमान मानलं जातं. कारण याने आरोग्यासंबंधी कितीतरी समस्या दूर होऊ शकतात. जर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने जर तांदळाचं पाणी प्यायलात तर सामान्य दिसणारं हे पाणी अनेक समस्या झटक्यात दूर करू शकतं. अशात आज आम्ही आपल्याला हेच समजून सांगणार आहोत की, उकडलेल्या तांदळाचं पाणी कधी आणि कसं प्यावं, तसेच हे कोणत्या लोकांसाठी फायदेशीर ठरतं.
काळ्या मिठासोबत तांदळाचं पाणी
उकडलेल्या तांदळाच्या पाण्यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरात फ्ल्यूइड संतुलित ठेवण्यासाठी गरजेचे असतात. यात जर चिमुटभर काळं मीठ टाकलं तर फायदा अधिक मिळतो. तांदळाचं पाणी पिण्याची योग्य वेळ सकाळी उपाशीपोटी असते.
तांदळाचं पाणी पिण्याचे फायदे
डिहायड्रेशनपासून बचाव
तांदळाच्या पाण्यात चिमुटभर मीठ घालून प्यायल्याने साध्या पाण्यापेक्षाही अधिक फायदे मिळतात. शरीरात हायड्रेशन कायम राहण्यास मदत मिळते. यात पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि सोडिअम यांसारखे तत्व असतात, ज्यामुळे रिहायड्रेशनमध्ये सुधारणा होते. यात काळं मीठ टाकल्याने इलेक्ट्रोलाइट्सची क्षमता आणखी वाढते.
बॉडी डिटॉक्स
काळ्या मिठामध्ये सल्फर आणि पोटॅशिअमसारखे ट्रेस मिनरल्स असतात, जे लिव्हर काम सुधारण्यात आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतात. तसंच तांदळाचं पाणी हळूहळू टॉक्सिन्स बाहेर काढतं. काळं मीठ आणि तांदळाचं पाणी या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर डिटॉक्सिफिकेशन अधिक वेगाने होतं.
एनर्जी मिळते
उकडलेल्या तांदळाच्या पाण्यात सहज पचन होणारे स्टार्च असतात, जे लवकर अॅब्जॉर्ज होतात. यामुळे पचन तंत्रावर जास्त दबाव पडताही एनर्जी मिळते. यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं, ज्याने डिहायड्रेशनमुळे येणारा थकवा रोखला जातो. शरीराला भरपूर एनर्जी मिळते.
पोट लगेच होईल
साफ तांदळाचं पाणी बद्धकोष्ठतेचा त्रास म्हणजे पोट साफ न होण्याचा त्रास दूर करण्यास मदत करतं. तांदळा्या पाण्यातील डायटरी फायबर पचन तंत्रात एक जेल तयार करतं, ज्याने पोट सहजपणे साफ होण्यास मदत मिळते. टॉयलेटला गेल्यावर त्रास होत नाही. जर हे पाणी नियमितपणे प्याल तर आतडी निरोगी राहतात.
ब्लड प्रेशर कंट्रोल
उकडलेल्या पाण्याने शरीरात सोडिअम आणि फ्ल्यूइड साचणं कमी होतं. ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत मिळते. याने शरीर हायड्रेट राहतं आणि इलेक्ट्रोलाइट्सही कायम राहतात. पचन सुधारतं आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट राहतं.
त्वचेसाठी फायदेशीर
तांदळाचं पाणी केवळ आरोग्यासाठी नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असतं. या पाण्याने त्वचेतील ओलावा कायम राहतो, ज्यामुळे त्वचा कोरडी होत नाही. यात स्टार्च आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात, जे त्वचेला आतून हायड्रेट करतात. या पाण्यात असेही काही पोषक तत्व असतात जे त्वचेसाठी आवश्यक कोलेजनचं उत्पादन वाढवण्यास मदत करतात.
Web Summary : Rice water, rich in electrolytes and starch, aids hydration, detoxification, and energy. Drinking it with black salt on an empty stomach helps digestion, controls blood pressure, and benefits skin health.
Web Summary : चावल का पानी, इलेक्ट्रोलाइट्स और स्टार्च से भरपूर, जलयोजन, विषहरण और ऊर्जा में सहायक है। इसे खाली पेट काले नमक के साथ पीने से पाचन में मदद मिलती है, रक्तचाप नियंत्रित होता है और त्वचा स्वस्थ रहती है।