Join us

अरे व्वा! फक्त पपईच नाही तर पानंही शरीरासाठी आहेत वरदान; त्वचा, केसांना होतो मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 19:36 IST

पपई हे देखील असंच एक फळ आहे ज्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. फक्त पपईचाच नाही तर त्यांच्या पानांचेही आश्चर्यकारक फायदे आहेत.

आहारात फळांचा समावेश करावा असं अनेकदा म्हटलं जातं. पपई हे देखील असंच एक फळ आहे ज्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. फक्त पपईचाच नाही तर त्यांच्या पानांचेही आश्चर्यकारक फायदे आहेत. पपईच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स, व्हिटॅमिन सी आणि फिनॉलिक कंपाउंड्स असतात जे फ्री रेडिकल्स काढून टाकतात आणि इंफ्लेमेशन कमी करतात. मधुमेहाच्या रुग्णांनाही या पानांचं सेवन केल्याने फायदा होऊ शकतो. पपईच्या पानांचा शरीरावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया...

पपईच्या पानांचे आरोग्यदायी फायदे

पचनास मदत

पपईची पानं पोटाच्या आरोग्यासाठी देखील चांगली असतात आणि या पानांचं सेवन पचनसंस्थेला देखील फायदेशीर ठरतं. पपईच्या पानांमुळे पचनाच्या समस्या दूर राहतात. बद्धकोष्ठता, पोट फुगणं आणि पोटात जळजळ यासारख्या समस्यांपासून देखील आराम मिळतो. 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त

मधुमेहाच्या रुग्णांनी पपईच्या पानांचं सेवन केल्याने मोठा फायदा होऊ शकतो. पपईची पानं ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी आणि इन्सुलिन सेंसिटिव्हिटी सुधारण्यासाठी प्रभावी आहेत. जर पपईची पानं नियमितपणे खाल्ली तर ब्लड शुगरचं प्रमाण वाढण्याची शक्यता कमी होते.

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत 

पपईच्या पानं मजबूत रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर आहेत. पपईची पानं खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट्ससह अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मिळतात जे  इम्यून सेल्सचं प्रोडक्शन वाढवतात आणि इन्फेक्शन, व्हायरस आणि इतर हानिकारक घटकांना दूर ठेवतात.

फ्री रेडिकल्सपासून सुटका

पपईच्या पानांमध्ये पॉवरफुल अँटी-ऑक्सिडंट्स असतात. या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि विविध प्रकारचे फ्लेव्होनॉइड्स आढळतात, जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण दूर करतात आणि शरीराचं नुकसान होण्यापासून वाचवतात. जर तुम्ही पपईच्या पानांचं पाणी प्यायलात तर शरीराला हानी पोहोचवणारे फ्री रेडिकल्स दूर राहतात. यामुळे हृदयाच्या आरोग्यालाही फायदा होतो.

शरीर डिटॉक्स होतं

पपईच्या पानांचं पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. आरोग्याशी संबंधित समस्या देखील कमी होतात.

त्वचा आणि केसांना फायदा

पपईच्या पानांचा केस आणि त्वचेलाही फायदा होतो. पपईच्या पानांमध्ये असलेले व्हिटॅमिन्स त्वचेचं नुकसान होऊ देत नाहीत, कोलेजनचं उत्पादन वाढवतात आणि सुरकुत्या कमी करण्यास प्रभावी असतात. हे त्वचेच्या समस्या दूर ठेवतात. पपईची पाने केसांच्या वाढीसाठी देखील चांगली असतात. विशेषतः टाळूसाठी फायदेशीर असतात आणि कोंड्याच्या समस्येला दूर ठेवतात. 

पपईची पानं कशी खावीत?

पपईची पानं अनेक प्रकारे खाऊ शकतात. ही पानं खाण्याऐवजी त्यांचा रस सहसा प्यायला जातो. पपईच्या पानांचा ताजा रस अधिक फायदेशीर ठरतो. पपईची पानं पाण्यात उकळून नंतर ते पाणी पिऊ शकता. पण जर कोणत्या आजारावर औषधं सुरू असतील तर हे पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य