उन्हाळा सुरू झाला की उन्हाळ्यातली खास फळं बाजारात यायला लागतात. आता फळांचा राजा आंबा खूप उशिराने येतो. पण त्याआधी बाजी मारून जातात ती टरबूज आणि खरबूज. त्यातही टरबूज अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. लालबूंद टरबूज समोर आलं की ते खाण्याचा मोह काही आवरत नाही. बहुतांश लोकांना टरबुजावर मीठ घालून खाण्याची सवय असते. बीपीसारखा त्रास असेल तर त्या लोकांनी हे टाळायला हवं. पण एरवी मात्र टरबुजावर मीठ घालून खाणं खूप फायद्याचं आहे (benefits of adding pinch of salt on watermelon before eating it). आणि तीच खरी टरबूज खाण्याची योग्य पद्धत आहे, असंही म्हणतात. याचे नेमके काय फायदे आहेत ते पाहा...(why it is important to add pinch of salt on watermelon before eating it?)
टरबुजावर मीठ घालून खाण्याचे फायदे
१. उन्हाळ्याच्या दिवसांत खूप घाम येतो. सतत घाम येऊन शरीरातली पाणी पातळी कमी होते. त्यामुळे इलेक्ट्रोलाईट्स बॅलेन्सही बिघडतो. अशावेळी टरबुजावर मीठ घालून खाणं खूप फायद्याचं ठरतं. कारण टरबुजामधे पाणी भरपूर प्रमाणात असतं. शिवाय त्यावर मीठ घालून खाल्ल्याने इलेक्ट्रोलाईट्सही मिळतात.
आमवाताचं दुखणं असेल तर सकाळी उठताच जाणवतात 'ही ' लक्षणं- वेळीच सावध होऊन ५ उपाय करा
२. टरबुजावर मीठ घालून खाल्ल्याने चवीमध्ये सुद्धा खूप बदल होतो. टरबुजाचा गोडवा आणखी वाढतो. त्यामुळे जास्त चवीने टरबूज खायचं असेल तर त्यावर मीठ अवश्य घाला.
३. टरबुजावर थोडंसं मीठ घालून खाल्लं तर ते पचायला अधिक सोपं होतं. उन्हाळ्यात पचनाच्या समस्या वाढलेल्या असतात. अशावेळी टरबुजावर मीठ घालून खाणं जास्त फायद्याचं ठरू शकतं.
वाळवण स्पेशल: उपवासाचे खमंग कुरकुरीत सांडगे, उपवासाला येईल खुसखुशीत चव, घ्या साेपी रेसिपी
४. बऱ्याचदा असं होतं की टरबुजाला काहीच चव नसते. ते म्हणावं तसं गोड नसतं. असं टरबूज मग खावं वाटत नाही. अशावेळी या टरबुजावर जर चिमूटभर मीठ घालून खाल्लं तर त्याची चव निश्चितच खुलते आणि ते खाल्लं जातं.
Web Summary : Adding salt to watermelon enhances taste, balances electrolytes lost through sweat, aids digestion, and improves flavor, especially in less sweet fruits. It's a beneficial summer practice.
Web Summary : तरबूज पर नमक डालने से स्वाद बढ़ता है, पसीने से खोए इलेक्ट्रोलाइट्स संतुलित होते हैं, पाचन में मदद मिलती है, और कम मीठे फलों का स्वाद भी बेहतर होता है। यह गर्मी के लिए फायदेमंद है।