बीट अत्यंत पौष्टिक असतेओके. त्यामध्ये लोह, फोलेट, फायबर आणि अँण्टी ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे ते आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. बीटाचे विविध पदार्थ करता येतात. (Beetroot cutlets mouth watering recipe! See the perfect recipe for making beautiful pink cutlets)अनेक पदार्थ करता येतात आणि त्यापैकी बिटाचे कटलेट हा एक लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ आहे. कटलेट्स बनवताना बीटाचा गडद लाल रंग आणि हलकी गोडसर चव सगळ्यांनाच आवडते.
साहित्य
बीट, आलं, लसूण, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, मीठ ,गरम मसाला, लिंबू, आमचूर पूड, ब्रेडक्रम्स, रवा, बटाटा, तेल
कृती
१. बीट मस्त धुवा आणि उकडून घ्या. बीट उकडल्यावर त्याची सालं काढून टाका आणि मग ते किसून घ्या. कुसकरले तरी चालते मात्र त्याला आकार छान येत नाही. बटाटेही उकडून घ्यायचे. दोन बीट तर एक बटाटा असे प्रमाण घ्या. बटाटा नको तर पनीर घ्या.
२. कांदा अगदी बारीक चिरुन घ्यायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करुन घ्यायचे. कोथिंबीरीची जुडी निवडायची आणि बारीक चिरायची. आलं-लसूण पेस्ट तयार करायची. सगळे पदार्थ एकत्र करायचे. बीट, बटाटा, आलं-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरचीचे तुकडे मिक्स करायचे. त्यात चवी पुरते मीठ घालायचे आणि चमचाभर आमचूर तसेच गरम मसाला घालायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करायचे.
३. मिश्रणाचे सारखे गोळे करून त्याचे कटलेटच्या आकारात थापून घ्यायचे आणि मग ब्रेडक्रम्समध्ये घोळवून घ्यायचे. नंतर थोड्या रव्यातही घोळवायचे. तव्यावर थोडे तेल घालून छान परतून घ्यायचे. कटलेट दोन्ही बाजूंनी खमंग परतले की बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान नरम लागतात. बीटामुळे त्यांना सुंदर लालसर रंग येतो आणि दिसायलाही ते खूप चविष्ट असतात.
हे कटलेट गरमागरमच खायचे. चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खाल्ले की खूपच स्वादिष्ट लागतात. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या खाण्यासाठी किंवा पाहुण्यंसाठी म्हणून बीटाचे कटलेट उत्तम पदार्थ आहे. चवही आणि पौष्टिकही.