Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > चमचाभर तेलात आप्पे पात्रात करा खमंग बटाटेवडे! अजिबात तेलकट न होता लागतील खमंग...

चमचाभर तेलात आप्पे पात्रात करा खमंग बटाटेवडे! अजिबात तेलकट न होता लागतील खमंग...

Batata Vada in Appe Patra : How To Make Healthy Batata Vada At Home : batata vada without deep frying : कमी तेलकट आणि तळण्याची झंझटच नाही- आप्पे पात्रातील बटाटे वडे करण्याची ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2026 10:30 IST2026-01-25T10:30:00+5:302026-01-25T10:30:02+5:30

Batata Vada in Appe Patra : How To Make Healthy Batata Vada At Home : batata vada without deep frying : कमी तेलकट आणि तळण्याची झंझटच नाही- आप्पे पात्रातील बटाटे वडे करण्याची ट्रिक...

Batata Vada in Appe Patra batata vada without deep frying How To Make Healthy Batata Vada At Home appe patra batata vada recipe | चमचाभर तेलात आप्पे पात्रात करा खमंग बटाटेवडे! अजिबात तेलकट न होता लागतील खमंग...

चमचाभर तेलात आप्पे पात्रात करा खमंग बटाटेवडे! अजिबात तेलकट न होता लागतील खमंग...

'बटाटावडा' म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो गरमागरम वाफाळलेला वडा आणि त्यासोबतची सुकी तिखट चटणी. अनेकदा भूक लागल्यावर काहीतरी मस्त चमचमीत, गरमागरम, झणझणीत खाण्याची इच्छा होते तेव्हा आपण हमखास 'बटाटावडा' खाण पसंत करतो. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक, बटाटावडा हा सर्वांचाच ऑल-टाईम फेवरिट...पण रोजच्या आहारात जास्त तेल टाळायचं असेल, तरी चविष्ट बटाटावडा खायचा मोह आवरत नाही. डाएट करणाऱ्या ( batata vada without deep frying) किंवा हेल्थ कॉन्शियस असलेल्या लोकांसाठी 'तेलकट' बटाटावडा खाणे नेहमीच शक्य नसते. वडे तळताना त्यात खूप तेल शोषले जाते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशावेळी अप्पे पात्र तुमच्या उपयोगी येऊ शकतं. अगदी कमी तेलात, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे बटाटावडे घरच्याघरीच सहज तयार करता येतात. आपण फक्त १ ते २ चमचे तेलात अगदी विकतसारखेच बाहेर गाड्यावर मिळतात तसेच चविष्ट बटाटे वडे तयार करु शकता(How To Make Healthy Batata Vada At Home).

नेहमीचे तळलेले बटाटेवडे खाल्ल्यामुळे शरीरात तेल जास्त जातं आणि आरोग्याचीही काळजीही वाटते. अशावेळी अप्पे पात्रात तयार केलेला बटाटावडा हा एक परफेक्ट पर्याय ठरतो. अगदी कमी तेलात, न तळता आणि तरीही चवीत कुठलीही तडजोड न करता हे वडे सहज घरी तयार करता येतात. घरातीलच साहित्य वापरून, झटपट आणि हेल्दी पद्धतीने तयार करता येणारा हा आप्पे पात्रांतील बटाटावडा नक्कीच एकदा करून (appe patra batata vada recipe) पाहण्यासारखा आहे.

साहित्य :- 

१. उकडलेले बटाटे - ३ ते ४
२. बारीक चिरलेला कांदा - १ कप 
३. हिरवी मिरची - २ (बारीक चिरलेली)
४. आले - १ टेबलस्पून (किसलेले)
५. मोहरी - १/२ टेबलस्पून 
६. हिंग - चिमूटभर
७. हळद - १/२ टेबलस्पून 
८. मीठ - चवीनुसार
९. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१०. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 
११. कडीपत्ता - ५ ते ६ पान 
१२. जिरे - १ टेबलस्पून 
१३. बेसन - १ कप
१४. तांदळाचे पीठ - २ टेबलस्पून (कुरकुरीतपणासाठी)
१५. ओवा - १/२ टेबलस्पून 
१६. लाल तिखट - १/२ टेबलस्पून 
१७. पाणी - गरजेनुसार
१८. तेल - १ ते २ टेबलस्पून 

शिळ्या भाजीचे गरमागरम टेस्टी पराठे, आजीबाईच्या स्वयंपाकघरातलं सिक्रेट- ५ मिनिटांत हॉटेलसारखे खरपूस पराठे ताटात...


घड्याळ लावून फक्त १० मिनिटांत करा पोह्यांचा ढोकळा, कापसारखा पांढराशुभ्र आणि मऊ-पाहा रेसिपी...

कृती :- 

१. बटाट्याची भाजी तयार करणे :- सर्वात आधी उकडलेले बटाटे मॅश करून घ्या. कढईत थोडं तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कडीपत्त्याची फोडणी द्या. त्यात मिरची-आलं-लसूण पेस्ट, लिंबाचा रस घालून परता. आता हळद आणि मॅश केलेले बटाटे, मीठ आणि कोथिंबीर घालून भाजी चांगली मिक्स करा. ही भाजी थंड झाल्यावर तिचे लहान लहान गोल गोळे (गोळ्यांचा आकार अप्पे पात्राच्या खाचांएवढा ठेवावा) तयार करून घ्या.

२. बेसनाचे पीठ भिजवणे :- एका बाऊलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, ओवा, मीठ, हळद आणि तिखट एकत्र करा. त्यात थोडे थोडे पाणी घालून मध्यम घट्ट मिश्रण तयार करा. लक्षात ठेवा, पीठ जास्त पातळ नसावे, अन्यथा ते वड्याला व्यवस्थित चिकटणार नाही.

ना कांदेपोहे ना मटारपोहे ना तर्रीपोहे आता खा चटणी पोहे! चमचमीत चवीचे असे पोहे एकदा खा-रोज कराल...

३. आप्पे पात्रात वडे भाजणे :- गॅसवर आप्पे पात्र गरम करायला ठेवा आणि प्रत्येक खाचेमध्ये फक्त २ ते ३ थेंब तेल टाका. आता बटाट्याचे तयार केलेले गोळे बेसनाच्या पिठात बुडवून एक एक करून अप्पे पात्राच्या खाचांमध्ये ठेवा. मंद आचेवर झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे वाफवून घ्या. त्यानंतर वडे उलटून दुसऱ्या बाजूनेही थोडे तेल सोडून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

इतर खास टिप्स... 

१. अधिक हेल्दी हवं असेल तर पिठीत थोडं ओट्स पीठ किंवा ज्वारीचं पीठ मिसळू शकता.
२. आप्पे पात्रामुळे वडे तळण्याऐवजी भाजले जातात, त्यामुळे तेल खूपच कमी लागतं.
३. हे वडे हिरव्या चटणीसोबत किंवा सुक्या लसणाच्या चटणीसोबत छान लागतात.
४. तळलेल्या वड्यांच्या तुलनेत यात ९०% कमी तेल वापरले जाते.
५. तेल कमी असल्यामुळे हे वडे खाल्ल्यानंतर जडपणा जाणवत नाही.
६. आप्पे पात्रात वड्यांना गोलाकार आकार छान मिळतो.

Web Title : हेल्दी बटाटा वड़ा रेसिपी: अप्पे पात्र में बनाएं स्वादिष्ट वड़ा!

Web Summary : इस रेसिपी के साथ बिना अपराधबोध के बटाटा वड़ा का आनंद लें! कम तेल में अप्पे पात्र में पके हुए, ये वड़े बाहर से कुरकुरे, अंदर से नरम और हेल्दी होते हैं। एक उत्तम नाश्ता!

Web Title : Healthy Batata Vada Recipe: Cook delicious vada in appe patra!

Web Summary : Enjoy guilt-free Batata Vada with this recipe! Cooked in an appe patra with minimal oil, these vadas are crispy outside, soft inside, and healthy. A perfect snack!