Join us

बटाट्याची भजी हॉटेलप्रमाणे कुरकुरीत होण्यासाठी बघा काय करायचं? टम्म फुगतील घरी केलेली भजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 18:36 IST

Batata Bhaji Recipe : भजी बनवण्याची योग्य पद्धत वापरली तर छान, कुरकुरीत भजी घरीच तयार होऊ शकतात.

संध्याकाळच्यावेळी काहीतरी चटपटीत, खमंग खाण्याची इच्छा प्रत्येकाचीच होते. संध्याकाळी चहाबरोबर खायला तुम्ही कांदा भजी, बटाटा भजी असे घरगुती पदार्थ ट्राय करू शकता. नेहमीच बाहेरचं खाल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. (How to make crispy batata bhaji) कोणाला कॉन्स्टिपेशन तर कोणाला खोकला असा त्रास बाहेरचे पदार्थ खाल्यानंतर उद्भवतो.

घरच्याघरी तयार केलेले पदार्थ खाल्ल्यास जराही तब्येतीला त्रास उद्भवत नाही. बटाटा भजी बनवताना बेसनाचं पीठ बटाट्याला व्यवस्थित लागत नाही अशा तक्रारी असतात. भजी बनवण्याची योग्य पद्धत वापरली तर छान, कुरकुरीत भजी घरीच तयार होऊ शकतात. (Batata Bhaji Recipe)

बटाटा भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

बटाटे

बेसन

हळद पावडर

लसूण

आले

हिरवी मिरची पेस्ट

मीठ

ओवा

लाल तिखट

चिरलेली कोथिंबीर

पाणी

तेल

कृती

१) बटाटा भजी करण्यासाठी सगळ्यात आधी बेसनाच्या पीठात मीठ, ओवा, लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर, पाणी घालून मिश्रण एकत्र करून घ्या. 

२) बेसनाचं मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ नसावं. 

३) बटाटे स्वच्छ धुवून त्याचे पातळ काप करून घ्या. हे काप बेसनाच्या पीठात घोळवा.

४) कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झालं की त्यात एकामागोमाग एक बेसन पीठ  लावलेले बटाट्याचे काप तळून घ्या. तयार आहे कुरकुरीत खमंग बटाटा भजी

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न