Lokmat Sakhi >Food > कोण म्हणतं घरी परफेक्ट बासुंदी करता येत नाही? १ टिप, मलईदार-दाट-सुगंधी बासुंदी करा घरीच

कोण म्हणतं घरी परफेक्ट बासुंदी करता येत नाही? १ टिप, मलईदार-दाट-सुगंधी बासुंदी करा घरीच

basundi recipe | how to make basundi sweet | easy milk basundi : मलाईदार घट्ट बासुंदी कशी तयार करायची? कमी साहित्यात बासुंदी होईल झटपट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2024 10:05 AM2024-04-06T10:05:25+5:302024-04-06T10:10:02+5:30

basundi recipe | how to make basundi sweet | easy milk basundi : मलाईदार घट्ट बासुंदी कशी तयार करायची? कमी साहित्यात बासुंदी होईल झटपट..

basundi recipe | how to make basundi sweet | easy milk basundi | कोण म्हणतं घरी परफेक्ट बासुंदी करता येत नाही? १ टिप, मलईदार-दाट-सुगंधी बासुंदी करा घरीच

कोण म्हणतं घरी परफेक्ट बासुंदी करता येत नाही? १ टिप, मलईदार-दाट-सुगंधी बासुंदी करा घरीच

काही दिवसात नवीन वर्षाचं आपण स्वागत करू (Gudhi Padhava). गुढीपाड्व्यानिमित्त घरात श्रीखंड पुरी, बटाट्याची भाजी, कुरडई, आमरस किंवा बासुंदीचा बेत आखला जातो. मलाईदार-गोड बासुंदी कोणाला नाही आवडत. बासुंदी खाण्याचा खवय्यावर्ग तसा मोठा आहे. गोडसर, मलाईदार बासुंदी आपण वाटी चाटून-पुसून खातो (Basundi Recipe). पण घरात मिठाईच्या दुकानात मिळते तशी बासुंदी तयार होत नाही (Cooking Tips).

बासुंदी तयार करायला तशी सोपी, पण साहित्यांचे अचूक प्रमाण माहित असायला हवे. जर आपल्याला गुढीपाड्व्यानिमित्त घट्ट मलाईदार बासुंदी तयार करायची असेल तर, ही रेसिपी नक्की फॉलो करून पाहा. मिठाईच्या दुकानात मिळते, तशी गोडसर बासुंदी घरीच तयार करता येईल(basundi recipe | how to make basundi sweet | easy milk basundi).

बासुंदी करण्यासाठी लागणारं साहित्य

दूध

साखर

२ कप रवा आणि पाणी, रव्याच्या कुरड्या करण्याची इन्स्टंट रेसिपी; फुलतात तिप्पट-चवही जबरदस्त

मिल्क मसाला

ड्रायफ्रुट्स

अशा पद्धती तयार करा मलाईदार बासुंदी

सर्वप्रथम, एका भांड्यात २ लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला उकळी फुटल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर त्यात एक कप साखर घालून ढवळत राहा. जोपर्यंत साखर विरघळत नाही, तोपर्यंत ढवळत राहा. नंतर त्यात ४ ते ५ टेबलस्पून मिल्क मसाला घालून मिक्स करा.

भूक लागली? कपभर गव्हाचं पीठ-२ कांद्याचे करा झटपट कांदा पराठा; १० मिनिटात डिश रेडी

दुधाला जोपर्यंत घट्टपणा येत नाही, तोपर्यंत चमच्याने ढवळत राहा. शिवाय गॅस मध्यम आचेवरच ठेवा. जेणेकरून दूध भांड्याच्या तळाशी लागणार नाही. दूध अर्धे आटल्यानंतर त्यात बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घाला, व बाऊलमध्ये घेऊन गोड बासुंदीचा आस्वाद लुटा. अशा प्रकारे गोड बासुंदी खाण्यासाठी रेडी.

Web Title: basundi recipe | how to make basundi sweet | easy milk basundi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.