Lokmat Sakhi >Food > बाजरीचे पीठ पेरुन करा मेथीचं चमचमीत पिठलं, गरमागरम पिठलं भाकर खा पोटभर

बाजरीचे पीठ पेरुन करा मेथीचं चमचमीत पिठलं, गरमागरम पिठलं भाकर खा पोटभर

Bajra and methi pithla recipe, easy to make and healthy : सोपी रेसिपी जर पौष्टिकही असेल तर आहार असायलाच हवी. मेथीचं बाजरी घालून करा मस्त पिठलं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2025 12:31 IST2025-06-10T12:29:27+5:302025-06-10T12:31:25+5:30

Bajra and methi pithla recipe, easy to make and healthy : सोपी रेसिपी जर पौष्टिकही असेल तर आहार असायलाच हवी. मेथीचं बाजरी घालून करा मस्त पिठलं.

Bajra and methi pithla recipe, easy to make and healthy | बाजरीचे पीठ पेरुन करा मेथीचं चमचमीत पिठलं, गरमागरम पिठलं भाकर खा पोटभर

बाजरीचे पीठ पेरुन करा मेथीचं चमचमीत पिठलं, गरमागरम पिठलं भाकर खा पोटभर

पिठलं भाकरी हा आपल्या महाराष्ट्रातला अगदी लोकप्रिय असा पदार्थ आहे. विविध प्रकारे पिठलं करता येते. (Bajra and methi pithla recipe, easy to make and healthy )मेथीचे बाजरीच्या पीठातील पिठलं कधी खाल्ले आहे का? चवीला अगदी छान असते. पाहा सोपी रेसिपी.   

साहित्य
मेथी, बाजरीचे पीठ, तेल, मोहरी, जिरे, हिंग, कांदा, हिरवी मिरची, लसूण, बेसन, मीठ, दही, कडीपत्ता, आलं 

कृती
१.  मेथीची ताजी जुडी घेऊन या आणि छान धुऊन घ्या. तसेच मेथी निवडायची आणि चांगली पाने चिरुन घ्यायची. मेथी चिरुन झाल्यावर जरा निथळवत ठेवायची. मेथीवर भरपूर माती असते. त्यामुळे जरा भिजवायची आणि पाणी काढून टाकायचे. 

२. कांदा छान बारीक चिरुन घ्यायचा. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. आल्याचा लहानसा तुकडा घ्यायचा. एका मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, आलं, लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि त्याची पेस्ट तयार करायची. 

३. एका कढईत तेल घ्यायचे. तेल जरा तापल्यावर त्यात चमचाभर मोहरी घालायची. मोहरी मस्त तडतडली की त्यात जिरे घालायचे. जिरं छान फुलू द्यायचं. त्यात कडीपत्याची पाने घालायची. कडीपत्ता छान परतायचा. मग फोडणीत हिरवी मिरची आलं आणि लसणाची तयार केलेली पेस्ट घालायची. चमचाभर हिंग घालायचे. सगळं मस्त परतून घ्या. लसणाचा खमंग वास सुटल्यावर फोडणीत बारीक चिरलेला कांदा घाला आणि कांदा परतून घ्या. छान गुलाबी परतायचा. 

४. कांदा परतल्यावर त्यात मेथी घालायची. बारीक चिरलेली मेथी घ्या आणि मस्त परता. मेथीची भाजी आकसते. जरा कमी होईल छान खसंग शिजेल मग त्यात चमचाभर बाजरीचे पीठ घाला. ढवळा आणखी एखादा चमचा घाला. थोडे बेसन घ्या. बेसन अर्धा चमचा बास होईल. चवी पुरते मीठ घाला. दह्याचे छान ताक करा आणि थोडे ताक पिठल्यात घाला.  त्यात थोडे पाणी घाला आणि वाफ काढून घ्या. ढवळा आणि गरज असल्यास आणखी थोडे पाणी घाला. पिठलं छान घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.     

Web Title: Bajra and methi pithla recipe, easy to make and healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.