आपल्याकडची खाद्यसंस्कृती अतिशय संपन्न आहे. ऋतुनुसार आहारात कोणता बदल करायला हवा त्यानुसार कोणत्या ऋतूमध्ये कोणते पदार्थ खायला हवेत हे आपल्याकडे ठरलेलं असतं. बाजरीचा भात हे एक त्याचं उत्तम उदाहरण. एरवी हा भात खूप खाल्ला जात नाही. पण हिवाळ्यात मात्र आवर्जून कित्येक घरांमध्ये बाजरीचा भात केला जातो. त्याला काही ठिकाणी बाजरीची खिचडी म्हणूनही ओळखलं जातं (bajra khichadi). बाजरी उष्ण असते. त्यामुळे हा भात हिवाळ्यात खाल्ल्यास अंगात उब निर्माण होते. बाजरीमध्ये कॅल्शियम आणि फायबरही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हाडांसाठी तो चांगलाच आहे, पण वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठी वन डिश मील म्हणूनही उत्तम आहे (traditional food in winter). हा भात कसा करायचा त्याची ही सोपी रेसिपी (Bajaricha Bhat Recipe)
बाजरीचा भात किंवा बाजरीची खिचडी करण्याची रेसिपी
साहित्य
दिड वाटी बाजरी आणि १ वाटी मुगाची डाळ
४ ते ५ हिरव्या मिरच्या आणि १० ते १२ लसूण पाकळ्या
थंडीत भूक फार लागते वजन वाढतंय भरभर, ‘हा’ एकच सोपा व्यायाम रोज करा, वजन उतरेल झरझर
२ ते ३ सुकलेल्या लाल मिरच्या, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप प्रत्येकी २ टेबलस्पून
चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जिरे, कडिपत्ता.
कृती
बाजरी पाण्याने धुवून घ्या. नंतर ती तासभर सुकू द्या. आणि अर्धवट सुकल्यानंतर मिक्सरमधून जाडीभरडी बारीक घ्या. तसेच मुगाची डाळही २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या.
हिवाळ्यात वापरा 'हे' घरगुती फेसवॉश- त्वचा इतकी छान होईल की विकतचे फेसवॉश विसराल
आता गॅसवर कुकर गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यात तेल, मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता, हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप घालून फोडणी करून घ्या.
त्यानंतर त्यात मिक्सरमधून भरडलेली बाजरी आणि मुगाची डाळ घाला. आता डाळ आणि बाजरीच्या दुप्पट पाणी घाला. चवीनुसार मीठ घालून कुकरचं झाकण लावा. मध्यम आचेवर ४ ते ५ शिट्या होऊ द्या. बाजरीची खिचडी करताना गॅस नेहमी मध्यम आचेवर असावा. मोठा करू नये.
थंडीमुळे हात कोरडे पडले, सुरकुतल्यासारखे दिसू लागले? 'हे' घरगुती स्क्रब वापरा, हात होतील मुलायम
यानंतर पुन्हा एका छोट्या कढईमध्ये खमंग फोडणी करून घ्या. ताटामध्ये भात वाढून घेतला की वरतून त्याला फोडणी घाला आणि गरमागरम भात खा. बाजरीचा भात केला की त्याच्या जोडीला अनेक ठिकाणी कढी केली जाते.
