Join us  

पुरणपोळी बिघडते-पुरण पातळ होतं? मऊ, लुसलुशीत परफेफ्ट पोळ्या करण्याच्या 'खास' टिप्स,

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 9:07 AM

Bail Pola Festival 2023 : पुरणपोळ्या फुटतात? मऊ, लुसलुशीत पोळ्या करण्यासाठी खास टिप्स; एकही पोळी फुटणार नाही

सणाच्या दिवशी किंवा खास प्रसंगाना आवर्जून गोडधोड पदार्थ बनवले जातात. पुरणपोळ्या हा पदार्थ त्यापैकीच एक आहे. बैलपोळा (Bail Pola Festival 2023) हा सण महाराष्ट्रभरात साजरा केला जातो.  या दिवशी पुरणाचा स्वंयपाक बऱ्याच घरांमध्ये केला जातो. पुरणपोळ्या खायला नेहमीच चविष्ट लागत असल्या तरी त्या बनवण्यात मात्र बराचवेळ जातो. (Cooking Hacks & Tips)

कधी सारण कोरडं होतं, कधी जास्त पातळ तर कधी पोळ्या लाटायला जमत नाही लाटण्याला चिकटतात. बनवलेल्या पोळ्यांमधून सारण बाहेर पडण्याचे प्रकारही होतात. (How to make perfect puran poli recipe) पुरणपोळ्या बनवण्याची सोपी आणि योग्य पद्धत अनेकींना माहित नसते. पोळ्या बिघडू नयेत म्हणून काय करावं, पुरणपोळ्या करण्याची योग्य पद्धत कशी आहे ते पाहूया. (Maharashtrian Puran poli Making)

१) पुरणपोळीची कणीक मळताना त्यात पाव टिस्पून हळद घाला. यामुळे पोळीला छान रंग येतो. नेहमी पाण्यात विरळलेली साखर मिसळा. यामुळे कणकेला मऊपणा येतो. 

२) कणीक मळून झाल्यानंतर तेल लावून झाकून ठेवा. तयार झाकलेल्या कणकेचा गोळा खेचून काढा आणि व्यवस्थित मळून घ्या. 

३) पुरण करताना हरभऱ्याची डाळ छान मऊ-होईपर्यंत शिजवावी. डाळ व्यवस्थित शिजली नाही तर डाळीला कडकपणा येतो. डाळ शिजवण्याच्या १ ते २ तास आधी भिजवून ठेवा. 

४) पुरणात गूळ घालताना  बारीक चिरून घाला किंवा किसून घालू शकता. पुरणात जास्त गूळ घातल्यास पोळ्या जास्त कडक होतात. कमी गूळ घातल्यास पोळ्या कमी गोड होतात.

५) जायफळ, वेलची, सुंठ पुरणात घातल्यामुळे डाळीचा शरीराला त्रास होत नाही. 

६) डाळ शिजवताना कढईत तूप घाला जेणेकरून डाळीचे दाणे एकमेकांना चिकटणार नाही आणि चांगला सुंगध येईल.

७) डाळीत गूळ घातल्यानंतर मिश्रण जास्त पातळ झाले तर ते पाणी कॉटनच्या कापडाने गाळून घ्या. 

८) पुरण कढईत गॅसवर ठेवल्यानंतर सतत ढवळत राहा. अन्यथा पुरण करपते. पुरण जास्त घट्ट झालं तर तुम्ही दूध घालून तुम्हाला हवं तेव्हढं  सॉफ्ट करू शकता. 

९) पोळी लाटताना पोळी व्यवस्थित पुरण भरून बंद करा. त्यानंतर मैदा लावून चपातीप्रमाणे पातळ लाटून घ्या. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्नभारतीय उत्सव-सण