हिवाळ्यात हिरवीगार मेथी बाजारात पाहायला मिळते. मेथी ही केवळ एक स्वादिष्ट भाजी नाही तर आयुर्वेदिक गुणधर्मांचा अनमोल खजिना देखील आहे. मेथीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून रक्षण होतं. आयुर्वेदिक उपचारांमध्ये तज्ज्ञ असलेल्या डॉ. चैताली राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेथीचा आहारात समावेश केला तर आरोग्य, सौंदर्य आणि उर्जेसारखे १० अविश्वसनीय फायदे देखील अनुभवाल ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. जाणून घेऊया फायदे...
- मेथी पचनशक्ती उत्तेजित करते. त्यामुळे गॅस, पोटफुगी, बद्धकोष्ठता आणि खाल्ल्यानंतर जडपणाची भावना प्रभावीपणे कमी होते. आतड्यांचं आरोग्य सुधारतं.
- मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी मेथी फायदेशीर आहे. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतं आणि रक्तातील ग्लुकोज स्थिर करण्यास मदत करतं. नियमित सेवन हे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी एक प्रभावी उपाय असल्याचं म्हटलं जातं.
- मेथी अँटी इन्फ्लेमेटरी आहे. हिवाळ्यात सांधे दुखी, वेदना आणि त्वचेच्या जळजळीपासून आराम मिळतो.
- मेथी रक्त शुद्ध करते, त्वचेची चमक सुधारते, पिंपल्स कमी करते आणि संपूर्ण शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
- मेथी मेटाबॉलिझ्मला सपोर्ट करते आणि शरीरातील अतिरिक्त विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते, उर्जेची पातळी वाढवते आणि दिवसभर तुम्हाला फ्रेश ठेवते.
- मेथीच्या पानांमध्ये नैसर्गिक लोह भरपूर प्रमाणात असतं. ते अशक्तपणा, थकवा आणि केस गळणं यासारख्या गोष्टींसाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
- मेथी स्तनपान करणाऱ्या मातांसाठी देखील अत्यंत फायेशीर आहे.
- मेथीचे थंड आणि कडू गुणधर्म शरीरातील अतिरिक्त पित्त कमी करतात. यामुळे त्वचा स्वच्छ, चमकदार आणि पिंपल्समुक्त होते कारण ती अंतर्गत उष्णता आणि जळजळ कमी करतं.
- जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात मेथीचा समावेश करा. मेथी मेटाबॉलिझ्म वाढवतं, क्रेव्हिंग कमी करते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.
- जीवनसत्त्व, लोह आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली मेथी केसांची मुळे मजबूत करते, कोंडा कमी करते आणि केसांची वाढ होते.
तुमच्या आहारात सुपरफूड मेथीचा समावेश केल्याने हे १० जबरदस्त फायदे मिळू शकतात. जर तुम्ही हार्मोनल इनबॅलेन्स किंवा पोषण कमतरतेचा सामना करत असाल, तर तुमच्या आहारात मेथीचा समावेश करण्याचा विचार करा. या हिवाळ्यात निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी दररोज मेथी खा.
