Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पिण्यासाठी पाणी उकळताना टाळा 'या' कॉमन चुका, नाही तर फायदे मिळण्याऐवजी होईल शरीराचं नुकसान

पिण्यासाठी पाणी उकळताना टाळा 'या' कॉमन चुका, नाही तर फायदे मिळण्याऐवजी होईल शरीराचं नुकसान

Water Boiling Tips : बरेच लोक पाणी चुकीच्या पद्धतीने उकळतात किंवा स्टोर करतात. ज्यामुळे आरोग्याला फायदे मिळण्याऐवजी नुकसानच अधिक होऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:36 IST2026-01-02T15:34:36+5:302026-01-02T15:36:18+5:30

Water Boiling Tips : बरेच लोक पाणी चुकीच्या पद्धतीने उकळतात किंवा स्टोर करतात. ज्यामुळे आरोग्याला फायदे मिळण्याऐवजी नुकसानच अधिक होऊ शकतात.

Avoid these mistakes when boiling drinking water | पिण्यासाठी पाणी उकळताना टाळा 'या' कॉमन चुका, नाही तर फायदे मिळण्याऐवजी होईल शरीराचं नुकसान

पिण्यासाठी पाणी उकळताना टाळा 'या' कॉमन चुका, नाही तर फायदे मिळण्याऐवजी होईल शरीराचं नुकसान

Water Boiling Tips : निरोगी राहण्यासाठी, पोटाच्या समस्या सोडवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी किंवा मग पचन तंत्र चांगलं ठेवण्यासाठी गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. खासकरून हिवाळ्यात आणि पावसाळ्यात उकळलेलं पाणी फिल्टरपेक्षाही सुरक्षित मानलं जातं. पण बरेच लोक पाणी चुकीच्या पद्धतीने उकळतात किंवा स्टोर करतात. ज्यामुळे आरोग्याला फायदे मिळण्याऐवजी नुकसानच अधिक होऊ शकतात. रिपोर्टनुसार, काही लोक पाणी उकळताना तीन मुख्य चुका करतात, ज्यामुळे तब्येत बिघडू शकते.

पाणी पुन्हा पुन्हा उकळणे

बऱ्याच लोकांना सवय असते की, ते एकदा उकळलेलं पाणी पुन्हा पुन्हा गरम करतात विज्ञान सांगतं की, जेव्हा पाणी पुन्हा पुन्हा उकळलं जातं, तेव्हा त्यातील मिनरल्सचं संतुलन बिघडतं. तसेच पाण्यात नायट्रेट्स, आर्सेनिक आणि फ्लोराइडसारख्या केमिकल्सचं प्रमाण वाढतं. हे विषारी तत्व किडनी आणि पचन तंत्रावर वाईट प्रभाव टाकतात.

पाणी जास्त वेळ उकळणे

पाणी शुद्ध करण्यासाठी ५ ते १० मिनिटं उकळणं पुरेसं आहे. जर आपण पाणी १ तासापर्यंत उकळलं तर त्यातील नॅचरल ऑक्सिजन कमी होतं. ऑक्सिजन नसलेलं पाणी प्यायल्यास टेस्ट तर वेगळी लागतेच, सोबतच या पाण्याने शरीरात हायड्रेशनच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. जास्त वाफ तयार झाल्याने पाण्यात अशुद्धता जास्त केंद्रित होते.

चुकीच्या पद्धतीने स्टोर करणे

पाणी उकळल्यानंतर कोणत्या भांड्यात ठेवलं जातं, हे फार महत्वाचं ठरतं. गरम पाणी कधीही प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ठेवू नये. गरम पाणी प्लास्टिकच्या बॉटलमधील घातक केमिकल शोषूण घेतं. ज्यामुळे कॅन्सर आणि हार्मोन्समध्ये असंतुलन होण्याचा धोका असतो. नेहमी काचेच्या, स्टीलच्या किंवा तांब्याच्या बॉटलमध्ये पाणी ठेवा. तसेच गरम केलेलं पाणी उघडं कधीच ठेवू नका. कारण त्याकडे वातावरणातील धूळ आणि बॅक्टेरिया अधिक आकर्षित होतात.

एक्सपर्टनुसार, पाण्याला उकळी येईपर्यंतच ते उका आणि २ ते ३ मिनिटांनी गॅस बंद करा. पाणी कोमट किंवा थंड झाल्यावरच गाळून प्यावे. एकदा उकळल्यानंतर पाणी २४ तासांच्या आत वापरावे. कारण जास्त वेळ ठेवलेल्या गरम पाण्याची शुद्धता नष्ट होते.

Web Title : पानी उबालते समय इन गलतियों से बचें; यह आपके स्वास्थ्य को नुकसान पहुंचा सकता है!

Web Summary : पानी को गलत तरीके से उबालने से स्वास्थ्य लाभ नहीं मिलते। बार-बार उबालने से हानिकारक रसायन बढ़ जाते हैं। ज्यादा उबालने से ऑक्सीजन कम हो जाती है। प्लास्टिक के कंटेनर से बचें; कांच, स्टील या तांबे का उपयोग करें। शुद्धता के लिए 24 घंटे के भीतर पानी पिएं।

Web Title : Avoid These Mistakes When Boiling Water; It Can Harm Your Health!

Web Summary : Boiling water improperly can negate health benefits. Re-boiling concentrates harmful chemicals. Over-boiling reduces oxygen. Avoid plastic containers; use glass, steel, or copper. Consume boiled water within 24 hours for optimal purity.