पत्ताकोबी, फुलकोबी अशा भाज्या आपण नेहमीच करतो. आता या नेहमीच्याच भाज्या आहेत, आम्ही नेहमीच खातो.. त्या करताना काय चुका होणार असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण तुम्ही जर बारकाईने निरिक्षण केलं तर आपल्यापैकी काही लोक असे आहेत ज्यांना या भाज्या किंवा या भाज्या घालून केलेले वेगवेगळे पदार्थ खाल्ल्याने अपचन, गॅसेस, पोट फुगणे असे कित्येक वेगवेगळे त्रास होतात (avoid 4 mistakes while cooking cauli flower and cabbage). हे त्रास का होतात आणि त्यासाठी पत्ताकोबी, फुलकोबी आणि ब्रोकोली यांचे वेगवेगळे पदार्थ करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, याविषयीची ही खास माहिती...(how to make cauli flower and cabbage more healthy?)
पत्ताकोबी, फुलकोबी आणि ब्राेकोलीची भाजी करताना काय काळजी घ्यावी?
याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी shweta_shah_nutritionist या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ४ गोष्टी सांगितल्या आहेत.
१. त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पत्ताकोबी, फुलकोबी किंवा ब्रोकोली यांच्यापैकी कोणतीही भाजी कराल तेव्हा ती भाजी चिरल्यानंतर ३० ते ४० मिनिटे तशीच ठेवा.
हार्ट ॲटॅकचा धोका कमी करणाऱ्या ५ गोष्टी! तज्ज्ञ सांगतात कमी वयात हृदयविकार नको तर..
त्याआधी ती शिजवू नका. कारण हवेच्या संपर्कात ती भाजी ठेवल्याने त्यातले अनेक घटक मोकळे होतात आणि पचनशक्ती नाजूक असणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होत नाही.
२. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भाज्या करताना जिरे आणि मोहरी अशी दोन्हींची फोडणी घाला. कारण हे दोन्ही पदार्थ पचनक्रिया अधिक चांगली होण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. जिरे, मोहरीमुळे या भाज्यांचे पचन सोपे होते.
३. बऱ्याच जणी फोडणी झाल्यानंतर चिरलेली पत्ताकोबी किंवा फुलकोबी कढईमध्ये घालतात आणि थोडीशी हलवून कढईवर झाकण ठेवून देतात. तज्ज्ञांच्यामते हे चुकीचं आहे.
तेलकट- तुपकट न खाताही कोलेस्टेरॉल वाढतं? तज्ज्ञ सांगतात ५ गोष्टी करा- कोलेस्टेरॉल कमी होईल
कारण झाकण ठेवून दिल्यामुळे त्या भाज्यांमधून निघणारे घटक भाजीतच राहतात आणि त्यामुळे अनेकांना पचनाचे त्रास होतात. त्यामुळे या भाज्या कढईत घालताच त्यांच्यावर लगेच झाकण ठेवू नका. त्यांच्यातून निघणारे पदार्थ हवेत मोकळे होऊ द्या.
४. ज्या लोकांना पचनाचा त्रास असतो त्यांनी या भाज्या नेहमी अगदी मऊ शिजल्यानंतरच खाव्या. सलाड किंवा हाफ कूक्ड पद्धतीने खाऊ नये.