थट्टे इडली हा दक्षिण भारतातील पारंपारिक आणि लोकप्रिय नाश्त्यांपैकी एक खास प्रकार आहे. साध्या इडलीपेक्षा तिचा आकार मोठा, जाड आणि अधिक स्पॉन्जी असतो. थट्टे म्हणजे थाळी किंवा प्लेट. (Authentic traditional Thatte Idli recipe - perfect South Indian recipe -, if you want to eat Idli then eat it like this )ही इडली तयार करताना पसरट थाळी वारली जाते म्हणून तिला थट्टे इडली म्हणतात. या इडलीचे नाव ती करण्याच्या पद्धतीवरून पडले आहे. ही इडली साध्या इडलीपेक्षा खुप जास्त मऊ असते. साऊथ मध्ये लोकं ही इडली भातासारखी कालवूनही खातात. त्यावर भरपूर तूप ओतले जाते. भरपूर पोडी घातली जाते किंवा फक्त तुपाशीच खाल्ली जाते. या पद्धतीने ही इडली करण्यासाठी रात्रभर काही भिजवायची गरज नाही पाहा कशी करायची.
साहित्य
तांदूळ, पाणी, पोहे, दही, इनो, तूप
कृती
१. वाटीभर तांदूळ भिजत घालायचे. तसेच वाटीभर पोहे ही भिजत घालायचे. दोन्ही पदार्थ एकत्र न भिजवता वेगवेगळे भिजवायचे. तीन तास तरी भिजायला हवेत. तीन तासांनंतर एका मिक्सरच्या भांड्यात तांदूळ घ्यायचे. पोहे घ्यायचे. वाटीभर दही घ्यायचे. त्याची पेस्ट वाटायची. घट्टच वाटायचे जास्त पाणी घालू नका. अगदी थोडे घाला. वाटून झाल्यावर एका खोलगट भांड्यात घ्यायचे आणि फेटायचे. त्याचे सॉफ्ट मिश्रण तयार करायचे. त्यात सगळ्यात शेवटी थोडे इनो घालायचे.
२. थट्टे इडलीसाठी वेगळी इडलीपात्र मिळते. पण ते जर नसेल तरी अगदी मस्त इडली करता येते. त्यासाठी खोलगट ताटली जी आपण नाश्त्यासाठी वापरतो तिचा वापर करायचा. कुकरमध्ये पाणी ठेवायचे वर ताटली ठेवायची. किंवा साध्या इडली पात्रात ढोकळ्याची प्लेट लावायची आणि त्यावर ताटली ठेवायची.
३. ताटलीला तूप लावायचे, त्यावर तयार केलेले मिश्रण लावायचा. कुकरमध्ये वाफवायचे. छान मऊ आणि मस्त इडली तयार होते. नंतर काढून घ्यायची वर सुकी चटणी आणि तूप घालायचे. चवीला एकदम मस्त असते.
