Join us
Daily Top 2Weekly Top 5

अस्सल साऊथ इंडियन चवीची चणाडाळ चटणी, एकदा ही पूड करुन ठेवा-हवी तेव्हा चटणी तयार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2025 18:29 IST

Authentic South Indian flavoured chutney, once you make this powder, you can make chutney anytime : अशी चटणी तयार करायला अगदीच सोपी. पाहा रेसिपी.

चटणी हा पदार्थ करायला अगदी सोपा असला , तरी काही चटणी प्रकार करायला वेळ लागतो. त्यामुळे पटकन हवी तशी चटणी तयार करणे काही वेळा शक्य होत नाही, अशावेळी चटणीसाठी उंस्टंट  पूड वापरुन मस्त चविष्ट चटणी करु शकता. (Authentic South Indian flavoured chutney, once you make this powder, you can make chutney anytime ) चटणीची पूड तयार करुन ठेवा. ही पूड कोरडी असल्यामुळे जास्त दिवस टिकते आणि प्रवासात, ऑफिसमध्ये डबा नेताना किंवा अचानक पाहुणे आले तरी अशी चटणी पूड उपयोगी ठरते. चणाडाळीची चटणी करण्यासाठी पूड आणि चटणीची रेसिपी पाहा. नक्की करा. 

चटणीच्या पूडीमुळे केवळ वेळच वाचत नाही, तर घरच्या चवीचा स्वादही कायम राहतो. म्हणूनच, रोजच्या जेवणात वैविध्य आणायचं असेल, तर विविध प्रकारच्या चटणी पूडी बनवून साठवून ठेवणं हा उत्तम पर्याय आहे.

साहित्य चणाडाळ, शेंगदाणे, सुकं खोबरं, तेल, हिरवी मिरची, मोहरी, कडीपत्ता, मीठ, कोथिंबीर, काश्मीरी लाल मिरची, आलं

कृती१. एका पॅनमध्ये चणाडाळ घ्यायची. मस्त भाजायची. नंतर गार करत ठेवायची. त्यातच शेंगदाणेही भाजून घ्या. शेंगदाण्याची सालं काढा. सुकं खोबरंही मस्त भाजून घ्यायचे. वेगवेगळेच भाजा. म्हणजे सगळे पदार्थ व्यवस्थित भाजले जातील. गार करुन घ्या. नंतर वाटून घ्या, सरसरीत पूड तयार करुन घ्यायची.  हवाबंद डब्यात साठवून ठेवायची. भरपूर पूड तयार करा. चटणी करताना वाटीभर पूड तरी वापरा म्हणजे चव छान लागेल.

२. मिक्सरच्या भांड्यात चटणीची पूड घ्यायची. एका फोडणी पात्रात तेल घ्यायचे. त्यात मोहरी घालायची. तडतडली की त्यात कडीपत्ता घालायचा. तसेच हिरवी मिरची घालायची. काश्मीरी लाल मिरची घालायची. आल्याचा तुकडा घालायचा. परतून घ्यायचे. परतून झाल्यावर फोडणीही मिक्सरच्या भांड्यात ओतायची. चवी पुरते मीठ घालायचे. मग त्यात कोथिंबीर घालायची आणि मस्त वाटून चटणी तयार करायची. मध्यम पातळ चटणी तयार करा.  चवीनुसार मीठ घाला. 

English
हिंदी सारांश
Web Title : South Indian Chana Dal Chutney: Make Powder, Instant Chutney Ready!

Web Summary : Make South Indian style chana dal chutney powder for quick, flavorful chutney anytime. This powder lasts long and is perfect for travel or unexpected guests. Simply blend the powder with a tempering of spices and fresh coriander for a delicious, convenient chutney.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स