Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > खाता एक जोरदार धपाटा! करा दह्यातले धपाटे-अस्सल मराठी खमंग खुसखुशीत धपाटा करा झटपट

खाता एक जोरदार धपाटा! करा दह्यातले धपाटे-अस्सल मराठी खमंग खुसखुशीत धपाटा करा झटपट

authentic Marathi dish dahi dhapata, make it and enjoy : अगदी सोपी मराठमोळी रेसिपी. एकदा कराच असा धपाटा. दही घालून वाढते चव.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2025 19:52 IST2025-05-30T19:51:24+5:302025-05-30T19:52:19+5:30

authentic Marathi dish dahi dhapata, make it and enjoy : अगदी सोपी मराठमोळी रेसिपी. एकदा कराच असा धपाटा. दही घालून वाढते चव.

authentic Marathi dish dahi dhapata, make it and enjoy | खाता एक जोरदार धपाटा! करा दह्यातले धपाटे-अस्सल मराठी खमंग खुसखुशीत धपाटा करा झटपट

खाता एक जोरदार धपाटा! करा दह्यातले धपाटे-अस्सल मराठी खमंग खुसखुशीत धपाटा करा झटपट

धपाटे तर खाताच पण असा दह्यातला धपाटा नक्की खाऊन पाहा. ( authentic Marathi dish dahi dhapata, make it and enjoy )चवीला मस्त करायला सोपा. 

साहित्य 
ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन, दही, पाणी, मीठ, हिंग, ओवा, धणे- जिरे पूड, हळद, लाल तिखट, हिरवी मिरची, तेल, पांढरे तीळ, कोथिंबीर, कांदा 

कृती 
१. एका खोलगट पातेल्यात किंवा परातीत ज्वारीचे पीठ घ्यायचे. त्यात गव्हाचे पीठ घालायचे. तसेच बेसन घालायचे. जर ज्वारी दोन वाट्या घेतली तर गव्हाचे पीठ एक वाटी घ्यायचे. तसेच बेसन अर्धी वाटी बेसन घ्यायचे. याच प्रमाणात पीठ घ्यायचे. जास्त करायचे असतील तर ज्वारीचे पीठ वाढवायचे त्यानुसार इतर पीठांचे प्रमाण वाढवायचे. बेसन जास्त होणार नाही याची काळजी घ्यायचे. 

२. पीठात चवी पुरते मीठ घालायचे. त्यात चमचाभर लाल तिखट घालायचे. पीठात हिंग घालायचे. चमचाभर हळद घालायची. धपाटे मस्त पिवळे होतात. चमचाभर धणे- जिरे पूड घाला आणि मग पांढरे तीळ घालायचे. छान ताजी कोथिंबीरीची जुडी घेऊन यायचे आणि निवडायची. कोथिंबीर धुवायची आणि मग बारीक चिरायची. तसेच हिरव्या मिरचीची पेस्ट करायची. ठेचून करा किंवा मिक्सरमधून वाटून घ्यायचे. पीठात चिरलेली कोथिंबीर घाला आणि हिरव्या मिरचीची पेस्टही घाला. एक कांदा मस्त बारीक चिरुन घ्यायचा. पीठामध्ये कांदा घालायचा. सगळं छान मिक्स करायचे.

३. पीठात मग दोन मोठे चमचे दही घालायचे. गरम तेल घालायचे. व्यवस्थित एकजीव करायचे.नंतर थोडे पाणी घालून पीठ मळायचे. पाण्याऐवजी ताकही वापरु शकता. पीठ मळून झाल्यावर लाटून करा किंवा पारंपारिक पद्धतीने धपाटे करा. 

४. एका पोलपाटावर ओला फडका ठेवायचा. फडके स्वच्छच असायला हवे. हाताला पाणी लावायचे. तसेच पीठाचा गोळा घ्यायचा. त्याला पाणी लावायचे आणि पाण्याच्या हातानेच थापायचा. तवा तापत ठेवायचा. जरा तापल्यावर त्यावर थोडे तेल घालायचे आणि मग धपाटे लावायचे. दोन्ही बाजूंना तेल लावा आणि खमंग परतून घ्यायचे.      

Web Title: authentic Marathi dish dahi dhapata, make it and enjoy