Lokmat Sakhi >Food > साबुदाण्याची खिचडी खूप गचका, चिकट होते? बघा काय चुकतं- खिचडी मोकळी, दाणेदार होण्यासाठी... 

साबुदाण्याची खिचडी खूप गचका, चिकट होते? बघा काय चुकतं- खिचडी मोकळी, दाणेदार होण्यासाठी... 

Ashadhi Ekadashi Special Sabudana Khichadi: आषाढी एकादशीच्या निमित्ताने साबुदाणा खिचडी करणार असाल तर ती परफेक्ट होण्यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवा..(simple tricks and tips for making perfect sabudana khichadi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2025 14:42 IST2025-07-04T14:41:29+5:302025-07-04T14:42:19+5:30

Ashadhi Ekadashi Special Sabudana Khichadi: आषाढी एकादशीच्या निमित्ताने साबुदाणा खिचडी करणार असाल तर ती परफेक्ट होण्यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवा..(simple tricks and tips for making perfect sabudana khichadi)

Ashadhi Ekadashi special food, why do sabudana khichadi becomes so sticky, simple tricks and tips for making perfect sabudana khichadi, how to enhance the taste of sago khichadi for fast  | साबुदाण्याची खिचडी खूप गचका, चिकट होते? बघा काय चुकतं- खिचडी मोकळी, दाणेदार होण्यासाठी... 

साबुदाण्याची खिचडी खूप गचका, चिकट होते? बघा काय चुकतं- खिचडी मोकळी, दाणेदार होण्यासाठी... 

Highlights साबुदाणा खिचडीला वाफ येण्याआधी अनेक जण तिच्यावर दूध, ताक किंवा पाणी शिंपडतात. त्याचं प्रमाण जास्त झाल्यासही खिचडी गचक, चिकट होऊ शकते. 

आषाढी एकादशी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. आषाढीच्या निमित्ताने घरातल्या सगळ्यांनाच उपवास असतो. त्यामुळे साहजिकच उपवासाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात. पण त्या सगळ्या पदार्थांमध्ये एक पदार्थ मात्र सगळ्यात अव्वल असतो आणि तो म्हणजे साबुदाण्याची खिचडी. बच्चेकंपनीसह अनेकांच्या ती अतिशय आवडीची. त्यामळे दुसरा एखादा पदार्थ एकवेळ टाळला जातो पण साबुदाणा खिचडी मात्र हमखास केलीच जाते. आता काही जणांकडची साबुदाणा खिचडी खूपच गचका आणि चिकट होते (why do sabudana khichadi becomes so sticky?). अशी खिचडी खावी वाटत नाही. म्हणूनच छान दाणेदार आणि मोकळी खिचडी कराययची असेल तर त्यासाठी काय करावं आणि काय टाळावं ते पाहूया..(simple tricks and tips for making perfect sabudana khichadi)

 

साबुदाण्याची खिचडी मोकळी, चवदार होण्यासाठी टिप्स..

१. साबुदाणा खिचडीमधला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे साबुदाणा. तो कसा भिजल्या जातो त्यावर तुमच्या खिचडीची चव आणि तिचं टेक्स्चर खूप अवलंबून असतं.

आषाढी एकादशी : विठुरायाच्या पुजेसाठी करा सुंंदर सजावट, ६ आयडिया- आकर्षक सजावट होईल झटपट

त्यामुळे साबुदाणा भिजवताना त्यात पाण्याचं प्रमाण योग्यच हवं. पाणी जास्त होऊन साबुदाणा खूप भिजला तर खिचडी नक्कीच गचका होते. त्यामुळे साबुदाणा भिजवताना साबुदाण्याच्या वर साधारण १ इंच एवढंच पाणी घालावं.

 

२. साबुदाणा खिचडीमध्ये जर शेंगदाण्याचा कूट कमी प्रमाणात घातला तर ती खिचडीही गचका किंवा चिकट होते. त्यामुळे कुटाचं प्रमाण अचूक ठेवा. साधारण १ वाटी भिजवलेला साबुदाणा तुमच्याकडे असेल तर त्यात अर्धी वाटी साबुदाण्याचा कूट घाला.

ओपन पोअर्समुळे चेहरा खराब दिसतो? गुलाबजल आणि ग्लिसरीन 'या' पद्धतीने लावा, पिगमेंटेशनही जातील 

साबुदाणा कढईमध्ये परतायला टाकण्याआधीच साबुदाण्यात दाण्याचा कूट घाला आणि ते व्यवस्थित एकत्र करूनच कढईत परतायला घाला.

३. साबुदाणा खिचडीला वाफ येण्याआधी अनेक जण तिच्यावर दूध, ताक किंवा पाणी शिंपडतात. त्याचं प्रमाण जास्त झाल्यासही खिचडी गचक, चिकट होऊ शकते. 

 

Web Title: Ashadhi Ekadashi special food, why do sabudana khichadi becomes so sticky, simple tricks and tips for making perfect sabudana khichadi, how to enhance the taste of sago khichadi for fast 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.