Lokmat Sakhi >Food > Ashadhi Ekadashi Food : आषाढी एकादशीला करा उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा! चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ

Ashadhi Ekadashi Food : आषाढी एकादशीला करा उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा! चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ

Ekadashi food : Ashadhi Ekadashi traditional dish: crispy medu vada for upvas: उपवासाच्या दिवशी चविष्ट कुरकुरीत मेदू वडा कसा करायचा पाहूया रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2025 15:50 IST2025-07-01T15:49:25+5:302025-07-01T15:50:36+5:30

Ekadashi food : Ashadhi Ekadashi traditional dish: crispy medu vada for upvas: उपवासाच्या दिवशी चविष्ट कुरकुरीत मेदू वडा कसा करायचा पाहूया रेसिपी

Ashadhi Ekadashi special food fasting medu vada recipe nutritious vrat food ideas | Ashadhi Ekadashi Food : आषाढी एकादशीला करा उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा! चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ

Ashadhi Ekadashi Food : आषाढी एकादशीला करा उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा! चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ

आषाढी एकादशी हा दिवस भक्ती, उपासना आणि सात्विक आहाराचा पवित्र संगम.(Upvasacha padarth) उपवास म्हटलं की, आपल्याला अनेक पदार्थ खावेसे वाटतात. बट्ट्याची भाजी, साबुदाणा खिचडी, पराठे, साबुदाणा वडा, भगर यांसारखे पदार्थ आपण आवडीने खातो.(Ashadhi Ekadashi traditional dish) परंतु तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. (crispy medu vada for upvas)
उपवासाच्या दिवशी आपल्याला कुरकुरीत, चविष्ट आणि एकाच वेळी आरोग्यदायी पदार्थ खायचा मूड असेल तर मेदू वडा हा चांगला पर्याय आहे.(Ekadashi food) आपण उडीद डाळीपासून केलेला वडा नेहमीच खातो. हा वडा प्रथिनांनी भरलेला असून दिवसभर ऊर्जेची कमतरता भासू देत नाही.(nutritious vrat food ideas) बाहेरून खमंग आणि आतून मऊसर, असा पारंपरिक स्वादिष्ट असलेला मेदू वडा उपवासालाही खाऊ शकतो. उपवासाच्या दिवशी चविष्ट कुरकुरीत मेदू वडा कसा करायचा पाहूया रेसिपी. 

Ashadhi Ekadashi Food : साबुदाणा खिचडी-पराठा खाऊन वैतागलात? करा उपवासाचे स्पेशल पॅटीस, मऊ-लुसलुशीत पौष्टिक पदार्थ

साहित्य 

भगर - १ कप
साबुदाणा - २ चमचे 
पाणी - २ कप
मीठ - चवीनुसार 
आले - हवे असल्यास 
उकडलेला बटाटा - १ 
शेंगदाण्याचा कूट - ४ चमचे 
दही - ३ चमचे 
मिरची पेस्ट 


कृती

1. सगळ्यात आधी मिक्सरमध्ये कपभर भगर आणि २ चमचे साबुदाणा घालून त्याचा पावडर तयार करा. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात दोन कप पाणी घाला. 

2. कढईमध्ये मीठ आणि हवे असल्यास आले किसून घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर मिक्सरमध्ये वाटलेला पावडरची भरड घाला. ५ ते ६ मिनिटे शिजवून घ्या. 

3. आता एका ताटात उकडलेला बटाटा किसून घ्या. त्यामध्ये दाण्याचा कूट, मिरचीची पेस्ट आणि दही घाला. आणि शिजवलेले पीठ घालून एकजीव करा. या मिश्रणाचे पीठ तयार करा. 

4. हाताला तेल लावून त्याचे वडे तयार करा. मध्यभागी खड्डा करुन घ्या. जसे मेदू वडा तयार करताना करतो अगदी तसेच. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मेदू वडा तळा. तयार होईल कुरकुरीत क्रिस्पी उपवासाचा मेदू वडा. 
 

Web Title: Ashadhi Ekadashi special food fasting medu vada recipe nutritious vrat food ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.