आषाढ महिन्याला आता नुकतीच सुरुवात झाली आहे (Ashadh Special). आषाढाचे वैशिष्ट्य म्हणजे घरोघरी केले जाणारे तळण.. अशा काही जुन्या परंपरा पाहिल्या की आपली खाद्य संस्कृती किती समृद्ध आहे याची जाणीव होते. आषाढामध्ये तिखट- मीठ घातलेल्या पुऱ्या आणि गूळ घालून केलेल्या पुऱ्या घरोघरी केल्या जातात. या पुऱ्यांसोबत थोडा दहीभात वाढला जातो आणि तो नैवेद्य गावातल्या देवीच्या मंदिरात नेला जातो. थोड्याफार फरकाने ही परंपरा महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात दिसून येते. काही जणींना आषाढातल्या गोड पुऱ्या परफेक्ट जमत नाहीत. कधी त्या वातड होतात तर कधी गूळ कमी झाल्याने त्यात काही गोडवाच नसतो (goad puri recipe in Marathi). म्हणूनच आता आषाढ स्पेशल गुळाच्या गोड पुऱ्यांची ही रेसिपी पाहा आणि ट्राय करा.(how to make gulachi poori for ashadh?)
आषाढातल्या गुळाच्या गोड पुऱ्यांची रेसिपी
साहित्य
१ वाटी कणिक
अर्धी ते पाऊण वाटी गूळ
चिमूटभर मीठ
मराठवाडी जेवणाची चवच न्यारी!! पाहा खमंग, रसरशीत खाद्यसंस्कृती सांगणारे पारंपरिक पदार्थ
अर्धी वाटी दूध
तळण्यासाठी तेल
कृती
आषाढातल्या गोड पुऱ्या करण्यासाठी सगळ्यात आधी एक वाटी पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये गुळ भिजत घाला. गूळाचे खडे भिजत घालू नये कारण ते विरघळण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे गूळ किसून घ्यावा. तसेच पाणी थोडे कोमट करून घ्यावे.
गूळ पाण्यामध्ये पुर्णपणे विरघळल्यानंतरच कणिक भिजवायला घ्या. यासाठी एका भांड्यात कणिक घेऊन त्यात चिमूटभर मीठ आणि दूध घाला. त्यानंतर गुळाचं पाणी हळूहळू घालत कणिक भिजवून घ्या.
मुलांची बुद्धिमत्ता वाढविणारा १ खास पदार्थ! डॉक्टर सांगतात रोज खाऊ घाला- तब्येतही सुधारेल..
कणिक थोडी घट्ट भिजवावी. कारण घट्ट कणकेच्या पुऱ्या थोड्याशा कडक होऊन जास्त खमंग लागतात.
त्यानंतर नेहमीप्रमाणे कणकेचा छोटा गोळा घ्यावा आणि त्याच्या जाडसर पुऱ्या कराव्या. तिखट- मिठाच्या पुऱ्या आपण पातळ लाटतो. पण गुळाच्या पुऱ्या मात्र जाडसर लाटाव्या. कारण पातळ लाटल्या तर त्या कडक होऊन चावायला त्रास होऊ शकतो.