मूग आणि मटकी घालून केलेला मसाले भात हा चव, पौष्टिकता आणि पारंपरिक चवीचा पदार्थ आहे. साध्या मसाले भाताला कडधान्यांची जोड दिली की तो अधिक समाधानकारक आणि आरोग्यदायी होतो. विशेषतः महाराष्ट्रात घरगुती पद्धतीने केला जाणारा हा प्रकार सणावाराला, रविवारचा खास बेत किंवा डब्यासाठी उत्तम पर्याय मानला जातो.(As the aroma of moong-matki spiced rice fills the house, everyone will ask what's cooking today?) मूग आणि मटकी ही दोन्ही कडधान्ये प्रथिने, तंतुमय घटक आणि लोहाने समृद्ध असतात. त्यामुळे या भातामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते. एकदा नक्कीच करुन पाहा.
साहित्य
हिरवे मूग, मटकी, खोबरे, कांदा, मीठ, हळद, लाल तिखट, पाणी, तेल, तांदूळ, कोथिंबीर, तमालपत्र, वेलची, दालचिनी, कांदा, टोमॅटो, कडीपत्ता, हिरवी मिरची
कृती
१. खोबरे मस्त परतून घ्यायचे. एका मिक्सरच्या भांड्यात परतलेले खोबरे घ्यायचे. त्यात स्वच्छ निवडलेली कोथिंबीर घालायची. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. थोडे पाणी घाला आणि पेस्ट वाटून घ्यायची. मटकी आणि मूग एकत्र करुन रात्रभर भिजत ठेवायचे. मोड आलेले असतील तर आणखी मस्त चव लागेल. तांदूळही स्वच्छ धुवायचा आणि थोडावेळ भिजत ठेवा.
२. कांदा बारीक चिरुन घ्यायचा. टोमॅटोही मस्त बारीक चिरायचा. कोथिंबीर चिरायची. एका खोलगट पातेल्यात किंवा कढईत तेल गरम करायचे. त्यात तमालपत्र. वेलची, दालचिनीचा तुकडा घालायचा आणि मस्त परतून घ्यायचे. कडीपत्ता घालायचा. मसाले मस्त परतल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा गुलाबी परतायचा. त्यात बारीक चिरलेला टोमॅटोही घालायचा. त्याला पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचे. मग हळद आणि लाल तिखट घालायचे. गरम मसाला घालायचा मिश्रण ढवळून घ्यायचे. त्यात तांदूळ घालायचा आणि भात शिजवून घ्यायची.
३. कुकरमध्येही करु शकता. मात्र भात मोकळा नाही तर खिचडीसारखा होतो. जास्त मऊ आवडत असेल तर कुकरमध्ये पटकन तयार होतो. वरतून तूप घ्या आणि गरमागरम भात खा.
