कोबी ही साधी, स्वस्त आणि रोजच्या आहारात सहज वापरता येणारी भाजी असली तरी त्याचे आरोग्यदायी फायदेही तितकेच आहेत. पोषणतत्वांनी भरलेला आणि हलका असल्यामुळे तो पचायलाही सोपा आहे. कोबीमध्ये जीवनसत्त्व सी असते तसेच के ही असते. त्यात भरपूर प्रमाणात फायबर असते. (Are you tired of eating cabbage? Try this recipe, even your kids will tell you they now love cabbage )तसेच त्यात फोलेट , कॅल्शियम, पोट्रशियम, मॅग्नेशियम असते. त्यामुळे आहारात कोबी असणे फायद्याचे असते. मस्त कोबी मटारची भाजी करा आणि पाहा सगळे कसे आवडीने खातात. पाहा सोपी रेसिपी. करायला वेळीही जास्त लागणार नाही.
साहित्य
कोबी, बटाटा, हिरवी मिरची, मोहरी, तेल, मटार, हळद, लाल तिखट, मीठ, आलं, साखर, कडीपत्ता
कृती
१. कोबी स्वच्छ धुवायचे आणि बारीक चिरुन घ्यायचा. तसेच बटाटा सोलून घ्यायचा आणि त्याचे बारीक काप करुन घ्यायचे. मस्त ताजे मटार आणा आणि सोलून घ्या. भाज्यांचे प्रमाण आवडीनुसार ठरता. हिरव्या मिरचीचे तुकडे करुन घ्यायचे. तसेच कडीपत्त्याची पाने जरा कुस्करली तर त्याची चव आणि सुगंध जास्त छान लागेल. आलं किसून घ्यायचे.
२. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. तेल जरा तापले की त्यात मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात कडीपत्ता घालायचा. कडीपत्ता फुलला की त्यात किसलेले आले घालायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे मग त्यात मटार आणि बटाटा घालून छान परतून घ्यायचे. बटाटा आणि मटार छान मऊ होईपर्यंत परतायचे. परतून झाल्यावर त्यात चमचाभर साखर घालायची. तसेच चमचाभर हळद आणि लाल तिखटही घालायचे.
३. फोडणीत मीठ घालायचे आणि ढवळून घ्यायचे. जास्त शिजू द्यायचे नाही त्याआधीच कोबी घालायचा. मस्त परतून घ्यायचे. कोबी ढवळत राहायचा नाही. एकदा ढवळा आणि मग झाकून ठेवा. मस्त शिजला की झाकण काढून जरा परता म्हणजे खमंग होतो. कोबीची भाजी एकदा अशी करुन पाहा नक्कीच आवडेल.
