Lokmat Sakhi >Food > आप्पे करताना चिकटतात? सुटता-सुटत नाहीत आणि लगदा होतो? या स्टेप्सनी करा विकतपेक्षा भारी आप्पे

आप्पे करताना चिकटतात? सुटता-सुटत नाहीत आणि लगदा होतो? या स्टेप्सनी करा विकतपेक्षा भारी आप्पे

Appe recipe tips - batter sticks to pan while making aape? see how to make appe easily : घरी आप्पे करताना अजिबात फसणार नाहीत. पाहा काय करायचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2025 12:59 IST2025-09-08T12:58:02+5:302025-09-08T12:59:34+5:30

Appe recipe tips - batter sticks to pan while making aape? see how to make appe easily : घरी आप्पे करताना अजिबात फसणार नाहीत. पाहा काय करायचे.

Appe recipe tips - batter sticks to pan while making aape? see how to make appe easily | आप्पे करताना चिकटतात? सुटता-सुटत नाहीत आणि लगदा होतो? या स्टेप्सनी करा विकतपेक्षा भारी आप्पे

आप्पे करताना चिकटतात? सुटता-सुटत नाहीत आणि लगदा होतो? या स्टेप्सनी करा विकतपेक्षा भारी आप्पे

आप्पे हा एक फार लोकप्रिय पदार्थ आहे. हलका नाश्ता, संध्याकाळचा चहा किंवा पाहुण्यासाठी करायला अगदी योग्य ठरतो. तांदूळ-उडीद डाळीचे पीठ असो किंवा रव्याचे-तांदळाचे झटपट पीठ, आप्पे नेहमीच चवदार लागतात. (Appe recipe tips - batter sticks to pan while making aape?  see how to make appe easily )पण अनेकदा आप्पे करताना ते पात्राला चिकटतात. निघत नाहीत त्याचा लगदा होतो. विकत जसे छान गोल आप्पे मिळतात, तसे घरी करण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवा. आप्प्यांचा आकार बिघडतो आणि खायला मजा येत नाही. आत्ता चिंता नको. मस्त कुरकुरीत गोल आप्पे तयार करा. 
 
नवीन आप्पेपात्र घेतले असेल किंवा पात्र छान चालत नसेल तर ते वापरण्यापूर्वी व्यवस्थित धुऊन कोरडे करा. त्याला तेल लावा आणि ते मुरु द्या. त्यानंतर त्याला मध्यम आचेवर गरम करून घ्या. पुन्हा तेल लावा आणि कॉटनच्या कापडाने तेल पुसून घ्या.  प्रत्येक खाचेत थोडंसं तेल लावून पुसून घ्यावं. असे केल्याने तवा कंडिशन होतो आणि पुढे पीठ चिकटण्याची शक्यता कमी होते. रोजच्या वापरात तवा नेहमी कोरडा आणि स्वच्छ ठेवणंही गरजेचं आहे.

पिठाचा घट्टपणा ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. खूप पातळसर पीठ असेल तर ते सहज खाचेत पसरेल मात्र शिजताना चिकटेल. खूप घट्ट असेल तर आप्पे शिजून आतून कोरडे राहतील. म्हणून पीठ मध्यम घट्टसर ठेवणं उत्तम. त्यात थोडंसं दही घाला आणि खाण्याचा सोडा घाला त्यामुळे आप्पे सुटायला मदत होते. 

आप्पे लावण्याआधी आप्पेपात्र योग्य तापलेले असावे, अगदी थंड आप्पेपात्र असेल तर आप्पे चिकटतील आणि खूप गरम असेल तर बाहेरून पटकन करपतील पण आतून कच्चे राहतील. म्हणून मध्यम आचेवर तवा गरम करून मगच पीठ घालावं. प्रत्येक खाचेत पीठ घातल्यानंतर वरून एक-दोन थेंब तेल सोडलं की आप्पे  पटकन सुटतात.

आप्पे शिजवताना घाई न करता त्यांना नीट वेळ द्यावा. खालून तळ सोडायला लागले कीच आप्पे उलटावेत. जबरदस्तीने चमच्याने खुरडले तर ते नक्कीच फाटतात. त्यामुळे संयम ठेवून पलटल्यास आप्पे छान गोलसर होतात. पीठ लावण्याआधी मस्त तेल लावायचे. ब्रशचा वापर करणे उत्तम. आप्पेपात्राच्या प्रत्येक गोलाला मस्त तेल लावा. 

तवा वापरल्यानंतर त्याला लगेच डिशवॉशने घासू नये. साध्या कोमट पाण्याने धुऊन, स्वच्छ पुसून ठेवल्यास त्याची नॉनस्टिक पातळी टिकून राहते. तवा जास्त तेलकट ठेवला किंवा ओला ठेवला तर पुढच्या वेळी आप्पे करताना ते छान होणार नाहीत. आप्पेपात्र घासण्यासाठी खरखरीत काहीही वापरु नका. स्पंज सारखे मऊ काहीतरी वापरा. 
 

Web Title: Appe recipe tips - batter sticks to pan while making aape? see how to make appe easily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.