एकादशीचा उपवास आपल्याकडे अनेकजण करतात. कित्येक महिला तर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार असे आठवड्याचे उपवास तर करतातच. पण त्यासोबतच एकादशी, चतुर्थी असे उपवासही करतात. हे उपवास करून करून आणि उपवासाचे तेच ते पदार्थ नेहमी खाऊनही कंटाळा येतोच. म्हणूनच चवीमध्ये थोडा बदल हवा असेल तर उद्याच्या एकादशीच्या उपवासाला खमंग डोसा करून खा. हा पदार्थ पचायला तर हलका आहेच, पण अतिशय चवदारही आहे. शिवाय तो पोटभरीचा होतो. उपवासाचे पदार्थ खाऊन कित्येकांना ॲसिडीटी, अपचन होतं (how to make sabudana dosa?). त्यांच्यासाठीही हा उपवासाचा डोसा फायदेशीर आहे.(upvas dosa recipe)
उपवासाचा डोसा करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी साबुदाणा
१ वाटी भगर
जुन्या शिफॉन, जॉर्जेट साड्यांचे शिवा स्टायलिश फ्रॉक, स्वस्तात मस्त कलेक्शन- पाहा ८ सुंदर पॅटर्न्स
३ ते ४ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून जिरे
२ टेबलस्पून दही आणि चवीनुसार मीठ
कृती
ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी साबुदाणा २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पाणी घालून ३ ते ४ तास भिजत घाला.
यानंतर भगर थोडीशी भाजून ती थंड होऊ द्या आणि नंतर मिक्सरमध्ये घालून तिचं पीठ करा. हिरव्या मिरच्यांचीही बारीक पेस्ट करून घ्या.
रोज ८ तासाचं डेस्क जॉब करत असाल तर सावधान! होऊ शकतो 'हा' गंभीर आजार- पाहा लक्षणं
भिजलेल्या साबुदाण्यामध्ये थोडं पाणी घालून तो देखील वाटून घ्या. आता वाटलेला साबुदाणा, मिरच्यांची पेस्ट, भगरीचं पीठ एकत्र करा आणि मग त्यात दही आणि पाणी घालून ते भिजवून घ्या. चवीनुसार मीठ घालून हे पीठ अर्धा तास झाकून ठेवा.
यानंतर नेहमीप्रमाणे डोशाचा तवा गरम करून गरमागरम डोसे करा. शेंगदाण्याच्या चटणीसोबत हे डोसे छान लागतात.