Join us

खमंग खुसखुशीत अशी नारळाची पुरी करायची सोपी रेसिपी- लहानमोठे सारेच बोटं चाटून खातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2025 15:46 IST

An easy recipe for making delicious, crispy coconut puree - everyone will lick their fingers : नारळाची पुरी करायची सोपी पद्धत. नक्की करुन पाहा.

पुरी हा पदार्थ घरोघरी फार आवडीने केला जातो. त्यातही बरेच प्रकार असतात. एकदा नारळाच्या सारणाची खमंग पुरी नक्की खाऊन पाहा. चवीला एकदम मस्त असते. तसेच गरमागरम खान लागते. (An easy recipe for making delicious, crispy coconut puree - everyone will lick their fingers)एखाद्या तिखट भाजीसोबत किंवा रस्सा भाजीसोबत ही पुरी फार छान लागते. नारळ फक्त छान ताजा वापरा म्हणजे चव चांगली लागेल. पाहा नारळाची पुरी करायची सोपी रेसिपी.

साहित्यमैदा, मीठ, तूप, साखर, पाणी, जिरं, गरम मसाला, हिरवी मिरची, नारळ, काजू, तेल 

कृती १. एका खोलगट भांड्यात किंवा परातीत मैदा घ्या. मैद्याचे प्रमाण तुम्हाला किती पुऱ्या करायच्या आहेत त्यानुसार ठरवा. मैद्यात चमचाभर मीठ घाला तसेच दोन चमचे तूप घाला. थोडी साखर घाला आणि पीठ एकजीव करा. हळूहळू पाणी ओता आणि पीठ मळून घ्या. पीठ छान मळून झाल्यावर किमान तासभर तरी झाकून ठेवा. 

२. एका कढईत थोडे तूप घ्या. त्यावर चमचाभर जिरे घाला. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करा आणि ते तुकडेही फोडणीत घाला. छान परतून घ्या. त्यात चमचाभर गरम मसाला घाला आणि छान परता. मस्त ताजा नारळ फोडून घ्या. नारळ खवायचा आणि तो फोडणीत घालायचा. छान खमंग परतायचा. काजूची पूड तयार करायची. काजू जरा परतून घेतले की पूड जास्त सरसरीत तयार होते. 

३. नारळ घालून छान परतायचे. झाका आणि वाफ काढून घ्या. छान परतून झाल्यावर गार करत ठेवा. तयार पीठाचे गोळे करुन घ्यायचे. पुरीसाठी जेवढे पीठ घ्यायची गरज आहे तेवढेच पीठ घ्या. लाट्या मस्त लाटून घ्या आणि तयार सारणाचे गोळे तयार करा.

४. लाट्यांमध्ये सारणाचे गोळे भरा. मस्त सगळीकडून बंद करा आणि मग लाटून घ्या. एकीकडे कढईत तेल तापत ठेवा.  जशी साधी पुरी लाटता अगदी तशीच पुरी लाटायची. पुरी लाटून झाल्यावर गरमागरम तेलात तळून घ्यायची. छान फुलतेही आणि एकदम खुसखुशीत होते.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स