चटणी हा भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग आहे. ती कोणत्याही पदार्थासोबत खाल्ली की चवीत भर पडतेच. हिरवी चटणी, लाल चटणी, कोरडी चटणी, नारळाची चटणी अशा विविध प्रकारच्या चटण्या केल्या जातात. (Amchur Chutney - Easy and tasty recipe, add garlic to make a spicy dish, also goes well with rice)घरगुती जेवण असो वा नाश्त्याचे पदार्थ जसे की इडली, डोसा, भजी, वडे, पराठे , आदी सगळ्यांसोबत चटणी असेल तर खायला मजा येते. विविध चटणीची चवही तेवढीच वेगळी लागते. चव, सुगंध आणि तिखटपणासाठी चटणी खातात. असाच एक मस्त प्रकार म्हणजे आमचूर पूडची चटणी. ही फार प्रसिद्ध नसली तरी चवीला मस्त लागते. एकदा नक्की करुन पाहा.
साहित्य
लसूण, हिरवी मिरची, आमचूर पूड, कोथिंबीर, काश्मीरी लाल मिरची, मीठ, मोहरी
कृती
१. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. तसेच काश्मीरी लाल मिरचीचेही तुकडे करायचे. एकच घ्यायची. म्हणजे अति तिखट होणार नाही. कोथिंबीरीची जुडी निवडायची आणि धुवायची. मग बारीक चिरायची. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. लसूण जरा जास्त घ्या.
२. एका कढईत तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यात चमचाभर मोहरी घाला. मोहरी तडतडली ती त्यात लसूण घाला. कुरकुरीत परतायचा. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे, काश्मीरी लाल मिरचीचे तुकडे घालायचे आणि परतायचे. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सगळे पदार्थ व्यवस्थित परतून घ्यायचे.
३. गार करायचे आणि मग हाताने कुस्करायचे. त्याची पेस्ट तयार करायची.नंतर त्यात चमचाभर मीठ घाला. चवी पुरते घालायचे. दोन ते तीन चमचे आमचूर पूड घाला आणि मिक्स करायचे. छान एकजीव करायचे. चटणी जरा घट्टच होते. त्यात पाणी घालू नका.
