तांदूळ शिजवण्यासाठी लागणारं पाण्याचं प्रमाण त्याला लागणारा वेळ हा प्रामुख्यानं तांदळाचा प्रकार, त्याचा जुनाटपणा आणि शिजवण्याची पद्धत यावर अवलंबून असतो. तुम्ही कोणता तांदूळ निवडता यावर त्याला किती पाणी लागतं आणि शिजायला किती वेळ लागेल हे ठरतं. साधारणपणे बासमाती, जुना तांदूळ, ब्राऊन राईस असे भाताचे प्रकार अनेक घरांमध्ये आहारात घेतले जातात. कोणता भात शिजायला किती वेळ लागतो आणि पाणी किती वापरावं समजून घेऊ. (How much water should be added while cooking rice)
बासमती तांदूळ
बासमीत तांदूळ जो लांब आणि सुवासिक असतो त्याला सर्वात कमी पाण्याची गरज असते. साधारणपणे १ वाटी बासमती तांदळासाठी दीड ते पाऊणे दोन वाटी पाणी पुसेरे असते. हा भात १५ ते २० मिनिटांत शिजतो.
आंबेमोहोर, कोलम
याऊलट स्थानिक किंवा सामान्य पांढरा भात जसं की आंबेमोहोर, वाडा कोलम, सोना मसूरी या तांदळात स्टार्चचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी अधिक शोषून घेतो. यामुळे या तांदळासाठी साधारणपणे १ वाटी तांदळाला २ ते सव्वा दोन वाटी पाणी लागते आणि शिजायला १५ ते २० मिनिटं लागतात. हा भात शिजवताना थोडा चिकट होऊ शकतो.
ब्राऊन राईस
सर्वात जास्त पाणी आणि वेळ ब्राऊन राईस शिजवायला लागतो. एक वाटी ब्राऊन राईससाठी अडीच ते तीन वाटी पाणी लागते आणि शिजायला ३० ते ४५ मिनिटं लागतात. चांगल्या परीणामांसाठी ब्राऊन राईस किमान अर्धा ते एक तास भिजवा. प्रेशर कुकरऐवजी पातेल्यात शिजवताना पाण्याचे प्रमाण थोडे वाढवा.
महत्वाच्या टिप्स
कोणताही तांदूळ शिजवण्यासापूर्वी २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्यानं धुणं आवश्यक आहे. यामुळे तांदळातील स्टार्च निघून जाते आणि भात मऊ-मोकळा होतो. कुकरमध्ये भात शिजवल्यास पातेल्यात भात शिजवण्याच्या तुलनेत पाणी कमी लागतं. १ ते २ शिट्ट्यांमध्ये भात तयार होतो.
कढईत किंवा पातेल्यात भात शिजवताना पाणी जास्त लागते. भात शिजवताना झाकण घट्ट ठेवावे आणि शिजल्यानंतर गॅस बंद करून ५ मिनिटं तसंच ठेवावं यामुळे भात चांगला फुलतो. जर तांदूळ जुना असेल तर त्याला नवीन तांदळापेक्षा जास्त पाणी आणि वेळ लागू शकतो.