Join us

श्रावणात केला जाणारा खास पारंपरिक मराठी पदार्थ अळूची देठी! चव आणि पोषणाचा खजिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2025 15:28 IST

Aluchi Dethi, a special traditional Marathi dish made during Shravan! A treasure trove of taste and nutrition, healthy food : पारंपरिक पदार्थ करायलाच हवेत. एकदा ही अळूची देठी करुन पाहा. एकदम मस्त पदार्थ.

असे अनेक पारंपरिक पदार्थ आहेत जे आजकाल अगदी कमी केले जातात. मात्र ते चवीला एकदम मस्त असतात. भारतात कोणताही पदार्थ वाया जाऊ नये यासाठी विविध रेसिपी केल्या जातात. (Aluchi Dethi, a special traditional Marathi dish made during Shravan! A treasure trove of taste and nutrition, healthy food )अगदी भाजीची पानं ते भाजीची देठ काहीही वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाते. अळूची भाजी पावसाळ्यात घरोगघरी केली जाते. तसेच अळूवडीही केली जाते. चवीला अगदी मस्त आणि पौष्टिक अशा अळूचा आहारात समावेश असावाच. मात्र भाजीत अळूचा देठ काही वापरत नाहीत. या देठालाही छान चव असते. अळूच्या देठाचा एक पदार्थ केला जातो. त्याला देठी असे म्हणतात. ही देठी करायला अगदी सोपी आहे. उपासालाही खाल्ली जाते. पाहा कशी करायची.    

साहित्य अळूचे देठ, पाणी, मीठ, हिरवी मिरची, दही, नारळ, दाण्याचे कुट, तूप, जिरं

कृती १. अळूचे देठ व्यवस्थित साफ करुन घ्यायचे. त्याचे लहान तुकडे करायचे. पाण्यातून काढायचे. त्यावरील दोरे काढून घ्यायचे. देठीचे तुकडे करुन झाल्यावर ते एका खोलगट पातेल्यात घ्यायचे. त्यात मीठ घालायचे आणि देठ शिजवायचे. उकळून घ्यायचे. उकळून झाल्यावर जरा वाफ काढून घ्यायची. देठ मऊ झाले की पाणी काढून टाकायचे. 

२. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. तसेच ताजा नारळ फोडायचा आणि खवायचा. दाण्याचे कुट तसेच नारळ भरपूर घालायचा म्हणजे देठी चवीला एकदम छान लागते. देठं शिजल्यावर सुकी करायची मग हाताने जरा कुसकरायची. अगदी पातळ करु नका. थोडीच कुसकरुन घ्यायची. 

३. एका फोडणी पात्रात थोडे तूप घ्यायचे. तूप छान गरम करायचे मग त्यात चमचाभर जिरं घाला आणि जिरं छान फुलू द्या. जिरं फुलल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. खमंग फोडणी तयार करायची. फोडणी मिश्रणावर ओतायची. त्यात खरवडलेला नारळ घालायचा. तसेच दाण्याचे कुट घालायचे. सगळं एकजीव करुन घ्यायचे. 

४. सगळ्यात शेवटी अगदी जेवायला बसताना त्यात दही घालायचे आणि मिक्स करायचे. दही आधीच घातले तर त्याला पाणी सुटते. म्हणूनच दही शेवटी घालायचे. जास्त पाणी सुटत नाही चवही मस्त लागते.  

टॅग्स :श्रावण स्पेशल पदार्थश्रावण स्पेशलपाककृतीअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.