हिरव्यागार मटारच्या शेंगा बाजारात आता भरपूर प्रमाणात आल्या आहेत आणि शिवाय त्या खूप स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे हव्या तेवढ्या मटारच्या शेंगा घेऊन तुम्ही त्याचे कित्येक वेगवेगळे पदार्थ करून खाऊ शकता. असाच एक मटारचा चवदार आणि खमंग पदार्ट म्हणजे आलू मटार पराठा. आता आपण बटाट्याचा पराठा तर नेहमीच करतो. त्या पराठ्याला आता हिरव्यागार मटारची जोड द्या आणि अगदी खमंग, खरपूस असा आलू मटार पराठा करून पाहा (Aloo Matar Paratha Recipe). मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा रात्री जेवणातही तुम्ही आलू मटार पराठे खाऊ शकता.(how to make aloo matar paratha?)
आलू मटार पराठा करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी मटारचे कोवळ दाणे
२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
एका लिंबाचा रस आणि पाव वाटी कोथिंबीर
वजन पटापट कमी करायचंय? भरपूर प्रोटीन्स देणारे ५ पदार्थ नाश्त्यामध्ये खा, काही दिवसांतच स्लिम व्हाल..
धनेपूड, जिरेपूड आणि थोडा चाट मसाला
एका लिंबाचा रस, ४ ते ५ हिरव्या मिरच्या आणि इंचभर आलं
७ ते ८ लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि पराठ्यांसाठी कणिक
कृती
आलू मटार पराठा करण्यासाठी बटाटे उकडून मॅश करून घ्या. यानंतर मटार, मिरच्या, कोथिंबीर मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्या.
गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर मटारची पेस्ट, उकडलेले बटाटे, हळद, धनेपूड, जिरेपूड, मीठ घालून सगळं परतून घ्या.
पेरूची चटपटीत चटणी- दुसरी भाजी करण्याची गरजच नाही, मुलंही चटणी- पोळी पोटभर खातील
त्यानंतर गॅस बंद करा आणि मग त्यात लिंबाचा रस पिळून थोडा चाट मसाला घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या.
पराठे करण्यासाठी ज्याप्रमाणे कणिक भिजवतो तशी भिजवून घ्या आणि आता तयार केलेलं सारण पुर्णपणे थंड झाल्यानंतर त्याचे नेहमीप्रमाणे आलू पराठे करतो तसे पराठे करा. तूप किंवा तेल लावून हे पराठे खमंग भाजून घ्या.
