थंडीच्या दिवसांत शरीराला उब, ताकद आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खायला हवेत. थंडीच्या दिवसांत आरोग्याची काळजी घेणे कार गरजेचे असते. उष्ण पदार्थ जे इतर वेळी खाणे आपण टाळतो. ज्यामुळे पित्त वाढते असे पदार्थ खात नाही.मात्र ते पदार्थ हिवाळ्यात नक्की खावेत मात्र योग्य प्रमाणातच खावेत. (Aliv are a must-have in the diet during cold weather, a great food that provides warmth and comfort - especially for women)उष्ण अन्न खाणे अत्यंत गरजेचे असते. कारण शरीराला उब हवी असते. अशा वेळी खाल्या जाणाऱ्या विविध पदार्थांमध्ये अळिवाचा समावेश होतो. अळिव हे एक छोटंसं पण अतिशय पौष्टिक बी आहे, जे आरोग्यासाठी पौष्टिक मानलं जातं. कारण ते शरीराला आवश्यक उष्णता, ऊर्जा आणि पौष्टिकता देतं.
अळिवात प्रथिने (Protein), लोह (Iron), कॅल्शियम (Calcium), फायबर (Fiber), ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स, जीवनसत्त्व इ, आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषणतत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. ही सर्व तत्त्वे शरीराची ताकद वाढवतात, रक्तनिर्मिती सुधारतात आणि हाडे मजबूत ठेवतात.
थंडीमध्ये अळिव खाण्याचे अनेक फायदे आहेत. प्रथम म्हणजे, अळिव शरीरात उष्णता निर्माण करते, ज्यामुळे थंडीपासून बचाव होतो. दुसरं म्हणजे, त्यातील लोहामुळे हिमोग्लोबिन वाढते त्यामुळे रक्ताची पातळी वाढते. रक्ताची शुद्धता वाढते. पाळीवरही चांगला परिणाम होतो. अळिवातील कॅल्शियम हाडांना बळकटी देतो, तर फायबर पचन सुधारुन बद्धकोष्ठतेपासून आराम देतो. याशिवाय अळिव स्त्रियांमध्ये हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते आणि त्वचा, केसांसाठीही फायदेशीर ठरते.
अळिवाचे लाडू करता येतात. फार सोपे असतात आणि चविष्ट लागतात. अळिवाची खीर महिलांसाठी खास मानली जाते. किंवा अळिव दुधात मिक्स करुन भजत ठेवायचे आणि साखर घालून प्यायचे. विविध स्वरुपात ते सहज आहारात समाविष्ट करता येते. थंडीत अळिव खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि प्रतिकारशक्ती वाढते.
थोडक्यात सांगायचं तर, अळिव हे हिवाळ्यातील एक नैसर्गिक ऊर्जा-आणि आरोग्यवर्धक टॉनिक आहे. त्यामुळे या ऋतूत त्याचा समावेश आहारात नक्की करा आणि थंडीचा आनंद घ्या.
