उन्हाळा आला की आंब्याच्या गोड - रसाळ चवीची मजा घेण्याचा मोह आवरत नाही, आणि त्यातच जर घरच्या घरी तयार केलेलं मँगो आईस्क्रीम मिळालं तर मजाच काही वेगळी! बहुतेकवेळा आपण एकदाच भरपूर प्रमाणात आंबे विकत आणतो, तेव्हा हमखास आंब्याचे वेगवेगळे पदार्थ घरोघर तयार केले जातात. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना आणि मोठ्यांनाही थंडगार आईस्क्रीम खायला आवडते. पण बाजारातील आईस्क्रीममध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने सुचवलेली ही 'इन्स्टंट मँगो आईस्क्रीम' रेसिपी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. कोणत्याही महागड्या मशिनशिवाय आणि अवघ्या काही साहित्यात तयार होणारी ही आईस्क्रीम जितकी चविष्ट आहे तितकीच ती आरोग्यदायीही आहे(Akshay Kumar favorite mango ice cream recipe).
बॉलीवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार आपला फिटनेस आणि उत्तम लाईफस्टाईलसाठी खूपच लोकप्रिय आहे पण तुम्हाला माहीत आहे का, या फिटनेस फ्रीक अभिनेत्यालाही आंब्याचा मोह आवरत नाही? अक्षय कुमारला आवडणारी, साखर विरहित आणि हेल्थची काळजी घेत तयार केलेली 'इन्स्टंट मँगो आईस्क्रीम' सध्या सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कमी वेळात, कमी साहित्यांत आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी घरच्यांसाठी परफेक्ट ट्रीट ठरू शकते. अक्षय कुमारला (healthy mango ice cream without sugar at home) आंब्याची आईस्क्रीम खूप आवडते, पण तीही एक हेल्दी ट्विस्ट देऊन तयार केलेली...साखर न वापरता आणि केवळ ५ मिनिटांत तयार होणारी अक्षय कुमारची 'फेव्हरेट' मँगो आईस्क्रीम तुम्ही (Akshay Kumar diet friendly mango ice cream recipe) घरच्या घरी कशी बनवू शकता याची खास रेसिपी... उन्हाळ्याचा आनंद द्विगुणित करणारी ही इन्स्टंट रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. आंब्याचा पल्प - २ कप २. फ्रेश क्रीम - २५० मि. ली३. मिल्कमेड - २५० मि. ली४. टुटीफ्रुटी - १ ते २ टेबलस्पून
कृती :-
सगळ्यात आधी मिक्सरच्या एका भांड्यात आंब्याचा पल्प, फ्रेश क्रीम, मिल्कमेड असे सगळे जिन्नस एकत्रित घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. मिक्सर मधील मिश्रणाची पातळसर अशी पेस्ट तयार करून घ्यावी. मग एका डब्यांत ही तयार पेस्ट ओतून ते व्यवस्थित डब्यांत सेट करून डब्याचे झाकण लावावे. आईस्क्रीम व्यवस्थित सेट होण्यासाठी ते ३ ते ४ तासांसाठी फ्रिजरमध्ये ठेवून द्यावे.
३ ते ४ तासांनी आईस्क्रीम व्यवस्थित सेट झाल्यावर सर्व्ह करताना त्यावर टुटीफ्रुटी भुरभुरवून घालावी. घरातील उपलब्ध साहित्यात पटकन तयार होणारे आंब्याचे इन्स्टंट आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे. ना फारसे जिन्नस ना फार मोठा खटाटोप तरी अगदी अवघ्या १५ मिनिटांत मँगो आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे. यंदाच्या आंब्याच्या सिझनमध्ये किमान एकदा तरी या गोडधोड आंब्याच्या आईस्क्रीमची चव चाखलीच पाहिजे.
Web Summary : Akshay Kumar's sugar-free mango ice cream recipe is trending! This healthy treat uses mango pulp, fresh cream, and milkmaid. Mix, freeze for 3-4 hours, and enjoy a guilt-free, delicious dessert.
Web Summary : अक्षय कुमार की शुगर-फ्री मैंगो आइसक्रीम रेसिपी ट्रेंड कर रही है! इस हेल्दी ट्रीट में मैंगो पल्प, फ्रेश क्रीम और मिल्कमेड का इस्तेमाल होता है। मिक्स करें, 3-4 घंटे के लिए फ्रीज करें और स्वादिष्ट मिठाई का आनंद लें।